फोटो सौजन्य - सोशल मीडिया
रिंकू सिंह : टीम इंडियाची स्टार बॅट्समन रिंकू सिंग सध्या चर्चेत आहे. नुकताच खासदार प्रिया सरोज आणि रिंकू सिंग यांनी साखरपुडा केला आहे. त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर करून यासंदर्भात माहिती दिली आहे. भारताचा झंझावाती फलंदाज रिंकू सिंगची इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ही मालिका २२ जानेवारीपासून सुरू होणार आहे. या कालावधीत दोन्ही संघांमध्ये ५ सामने खेळवले जाणार आहेत. साखपुडा झाल्यानंतर आता रिंकू सिंहने त्याच्या वडिलांना खास गिफ्ट दिले आहे सध्या त्याची चर्चा सोशल मीडियावर सुरु आहे.
या मालिकेपूर्वी रिंकू सिंगने वडिलांना स्पोर्ट्स बाईक भेट दिली आहे. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रिंकूचे वडील खानचंद सिंग एलपीजी सिलिंडरची डिलिव्हरी करायचे. रिंकू सिंग यशस्वी क्रिकेटर झाल्यानंतरही त्याचे वडील त्याच्या कामावर जातात. अलीकडेच रिंकूने तिच्या वडिलांना कावासाकी निन्जा ४०० स्पोर्ट्स बाइक भेट दिली आहे. या बाईकची किंमत ५ लाखांपेक्षा जास्त आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चित्रात आणि व्हिडीओमध्ये रिंकूचे वडील दुचाकीवर बसून कामावर जाताना दिसत आहेत.
Rinku Singh gifted a Kawasaki Ninja Superbike to his father 🥹♥️
– Rinku is winning the heart of all…!!! pic.twitter.com/Ew9Ekgbel6
— Johns. (@CricCrazyJohns) January 20, 2025
भारताचा संघ इंग्लडविरुद्ध पाच सामान्यांची T२० मालिका खेळणार आहे. या मालिकेचा कर्णधार सूर्यकुमार यादव असणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. मोहम्मद शामी २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकानंतर झालेल्या दुखापतीमुळे संघाबाहेर होता आता त्याचे संघामध्ये पुनरागमन होणार आहे.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई , वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक).
पहिला T20 : २२ जानेवारी – ईडन गार्डन, कोलकाता
दुसरी T20 : २५ जानेवारी – एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
तिसरा T20 : २८ जानेवारी – सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट
चौथा T20 : ३१ जानेवारी – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
पाचवा T20 : २ फेब्रुवारी- वानखेडे स्टेडियम, मुंबई
रिंकू सिंगने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत २ कसोटी आणि ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. एकदिवसीयच्या २ डावात त्याने २७.५० च्या सरासरीने आणि १३४.१४ च्या स्ट्राईक रेटने ५५ धावा केल्या आहेत. तर रिंकू सिंगच्या नावावर T२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या २२ डावांमध्ये ५०७ धावा आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याने ३ अर्धशतकेही झळकावली आहेत.