फोटो सौजन्य - BCCI
मिचेल मार्श-रोहित शर्मा : भारताच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून T-२० विश्वचषक २०२४ चा (T-20 World Cup 2024) चॅम्पियन झाला. त्यानंतर भारताच्या सर्व खेळाडूंच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. कॅप्टन रोहित शर्मापासून ते मोहम्मद सिराजपर्यत सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू दिसले. टीम इंडियाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर भारताला १३ वर्षांनी विश्वचषक मिळवण्यात यश आहे. म्हणतात ना ज्यांच्याकडे असतं त्यांना कदर नाही आणि ज्यांना मिळत नाही ते प्रार्थना करत असतात. असच काही तरी २०२३ मध्ये एकदिवसीय विश्वचषकामध्ये विजेते झालेले ऑस्ट्रेलिया संघाचे आहे. ऑस्ट्रेलिया संघाचा T-२० विश्वचषकाचा कर्णधार मार्शचा (Mitchell marsh) एकदिवसीय विश्वचषकात फायनलमध्ये विजय मिळवल्यावर ट्रॉफीसोबतच एका फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मार्शचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याने या फोटोमध्ये एकदिवसीय विश्वचषकाच्या ट्रॉफीवर स्वतःचे दोन्ही पाय ठेवले आहेत. या फोटो वरून त्याला त्यावेळी बरेच ट्रोल करण्यात आले होते. पुन्हा एकदा हा फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहे. परंतु यावेळी फक्त मिचेल मार्श नाही तर भारताचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) फोटो चर्चेत आहे. T-२० विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलियाच्या संघाला सुपर-८ मध्ये पराभूत करून सेमीफायनलमधून बाहेर काढले. परंतु एकदिवसीय विश्वचषकामध्ये ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रोहित सेनेचा खेळ चुकला.
जगज्जेते होण्याचे स्वप्न भंगल्याने खेळाडूंना मोठा धक्का बसला होता, तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियन खेळाडूंना अभिमान होता. जेव्हा कर्णधार पॅट कमिन्सने एक लाखावर गप्प बसण्याबद्दल बोलले तेव्हा मिचेल मार्श विजयी ट्रॉफीवर पाय ठेवून पोझ देताना दिसला. तर एकीकडे भारताच्या संघाने T-२० विश्वचषकात विजय मिळवला आणि कॅप्टन रोहित शर्माने चाहत्यांची मनं जिंकली आहे. एकीकडे मिचेल मार्शने ट्रॉफीवर पाय ठेवले आहेत तर भारताच्या कर्णधाराने त्या ट्रॉफीला हृदयाला लावून घेतले आहे. हे दोन्ही फोटो सध्या प्रचंड चर्चेत आहेत.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या निवृत्तीची घोषणा केली आहे. तो आता वनडे आणि कसोटी सामन्यांमध्ये खेळणार आहे परंतु त्याने T-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.