फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताच्या संघाची काल ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मालिका पार पडली. टीम इंडियाचे तीन दिग्गज रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविद्र जडेजा यांनी 2024 मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर निवृतीची घोषणा केली होती. यावेळी चाहते फारच उदास होते. रोहित शर्मा, विराट कोहली हे दोघेही भारतीय संघासाठी आता फक्त एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहेत. भारताची पुढील मालिका ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळवली जाणार आहे. त्यासाठी सध्या रोहित आणि विराट दोघेही तयारी करत आहेत.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा पूर्वीपेक्षा खूपच तंदुरुस्त दिसत होता. याचा फायदा त्याला फलंदाजी करताना झाला, कारण त्याने धावांचा पाऊस पाडला. रोहित आता भारताची पुढील मालिका दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वीही रोहितने त्याच्या तंदुरुस्तीवर काम केले आहे. त्याच्या नवीन फोटोमुळे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा मुंबईच्या रणजी संघासोबत सराव करत आहे. तो पूर्वीपेक्षाही तंदुरुस्त दिसत आहे. चाहते असा अंदाज लावत आहेत की हिटमॅनने पुन्हा एकदा सुमारे ५ किलो वजन कमी केले आहे. रोहित सतत त्याच्या तंदुरुस्तीवर काम करत आहे, कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर हे या जबाबदारीचे नेतृत्व करत आहेत. नायरने गेल्या चार ते पाच महिन्यांत रोहितसोबत खूप मेहनत घेतली आहे, ज्यामुळे त्याला त्याच्या सर्व टीकाकारांना शांत करण्यास मदत झाली आहे.
Rohit Sharma has started training ahead of the South Africa ODI series. 🇮🇳🏆#India #Rohit #ODI #INDvSA pic.twitter.com/jLy6WYTaih — Sportskeeda (@Sportskeeda) November 8, 2025
पुढील दोन वर्षे अभिषेक नायरसोबत त्याच्या फिटनेसवर काम करत राहण्याची हिटमॅनची योजना आहे. रोहित शर्माचे २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळण्याचे स्वप्न आहे, म्हणूनच तो त्याच्या तंदुरुस्तीवर कठोर परिश्रम करत आहे. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत धावा काढून रोहित एकदिवसीय विश्वचषकात आपले स्थान पक्के करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहितला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. हिटमॅन बऱ्याच काळापासून एकदिवसीय स्वरूपात चांगली कामगिरी करत आहे.






