फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Royal Challengers Bangalore defeated Chennai at home after 17 years : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यांमध्ये चेन्नईच्या संघाला बंगळुरूने ५० धावांनी पराभूत करून १८ वर्षच दुष्काळ संपवला आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स फलंदाजांनी त्याचबरोबर गोलंदाजांनी देखील कमालीची कामगिरी केली आहे. २००८ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या संघाने फक्त एकदा चेपॉक मैदानावर पराभूत केले होते. आजच्या सामन्यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केलं त्यामुळे ते संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
चेन्नई विरुद्ध बंगळुरू सामन्याबद्दल बोलायचं झालं तर चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण हा निर्णय त्यांना चांगलाच महागात पडला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने फलंदाजीचे आव्हान स्वीकारत १९६ धावा केल्या. यामध्ये कॅप्टन रजत पाटीदारने संघासाठी अर्धशतकीय खेळी खेळली. रजत पाटीदारने संघासाठी ५१ महत्वाच्या धावा केल्या तर फिल्ल सॉल्टने संघासाठी ३२ धावांची खेळी खेळली. विराट कोहलीने मागील सामन्यांमध्ये अर्धशतक ठोकले होते तर या सामन्यात त्याने ३१ धावा केल्या. शेवटच्या काही चेंडू खेळण्यासाठी आलेला टीम डेव्हिडने संघासाठी महत्वाच्या ८ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या.
Match 8. Royal Challengers Bengaluru Won by 50 Run(s) https://t.co/I7maHMvZOk #CSKvRCB #TATAIPL #IPL2025
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2025
चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर रचिन रवींद्रने संघासाठी ३१ चेंडूंमध्ये ४१ धावा करून त्याला यश दयालने बाहेरचा रस्ता दाखवला. चेन्नईचा कर्णधार ऋतुराजने मागील सामन्यांमध्ये अर्धशतक केले होते पण या सामन्यात तो ० धावांवर बाद झाला. राहुल त्रिपाठी आणखी एकदा फेल ठरला. दीपक हुडा ४ धावा करून बाद झाला. शिवम दुबे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून फलंदाजीसाठी आला होता. शिवम दुबेने संघासाठी १५ चेंडूंमध्ये १९ धावा केल्या.
चेन्नईच्या गोलंदाजांबद्दल बोलायचं झाल तर नूर अहमदने संघासाठी ३ विकेट्स घेतले तर पाठीरानाने संघासाठी २ विकेट्स घेतले. खलील अहमद आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी १ विकेट घेतला. लियाम लिविंग्टनने संघासाठी ४ ओव्हरमध्ये २ विकेट घेतले तर कृणाल पंड्याने फक्त १ ओव्हर टाकली. जोश हझलवूडने संघासाठी ३ विकेट्स नावावर केले तर भुवनेश्वर कुमारने संघासाठी १ विकेट घेतला. यश दयालने संघासाठी २ विकेट्स घेतले.
चेन्नई सुपर किंग्सचा पुढील राजस्थान रॉयल्स विरुद्ध ३० मार्च रोजी खेळवला जाणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पुढील सामना गुजरात जायंट्सविरुद्ध होणार आहे हा सामना २ एप्रिल रोजी खेळवला जाणार आहे.