फोटो सौजन्य - IndianPremierLeague
राजस्थान राॅयल्स विरूद्ध पंजाब किंग्स पहिल्या डावाचा अहवाल : राजस्थान राॅयल्स यांचा सामना होमग्रांउड सुरु आहे, त्याचा सामना पंजाब किंग्सविरूद्ध आहे. या सामन्यात पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकुन पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्याचा पहिला डाव झाला आहे. या पहिल्या डावात पंजाब किग्सच्या संघाने 6 विकेट गमावून 219 धावा केल्या आहेत. आता राजस्थान राॅयल्सच्या संघासमोर 220 धावांचे लक्ष्य असणार आहे. आजच्या सामन्यात पहिल्या डावामध्ये खेळाडूंची कशी कामगिरी राहिली आहे यावर एकदा नजर टाका.
पंजाब किंग्सच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले तर, पंजाबचे दोन्ही सलामीवीर फलंदाज आज मोठी कामगिरी करू शकले नाही. प्रियांश आर्या याने आजच्या सामन्यात 7 चेंडु खेळले आणि यामध्ये त्याने 9 धावा करून विकेट गमावली. तर प्रभसिमरन सिंह याने देखील आज विशेष कामगिरी केली नाही. प्रभसिमरन सिंह आजच्या सामन्यात 10 चेंडुमध्ये त्याने 21 धावा केल्या आणि तुषार देशपांडेने बाहेरचा रस्ता दाखवला. मिचेल ओवन याला आज संघामध्ये स्थान मिळाले होते पण तो आज विशेष कामगिरी करु शकला नाही. पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने आजच्या सामन्यात महत्वाच्या धावा केल्या. त्याने 25 चेंडुमध्ये 30 धावा केल्या.
Innings break!
A crucial partnership between Nehal Wadhera and Shashank Singh help #PBKS set a total of 219/5 on the board 🤜🤛
Can the home side chase this down or will it be defended? 🤔
Scorecard ▶ https://t.co/HTpvGewE3N #TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/G4VywXLsxn
— IndianPremierLeague (@IPL) May 18, 2025
आजच्या सामन्याचा हिरो नेहाल वढेरा ठरला. त्याने आजच्या सामन्यात 37 चेंडुमध्ये 70 धावा केल्या, यामध्ये त्याने 5 चौकार आणि 5 षटकार मारले. आज त्याला फलंदाजीची संधी मिळाली आणि त्याने कमालिची कामगिरी केली आहे. शशांक सिंह याने संघासाठी आज आणखी एकदा कमालीची कामगिरी केली, त्याने आजच्या सामन्यात 30 चेंडूमध्ये 59 धावा केल्या. अजमतुला उमरजाई याने शेवटचं काय चेंडूमध्ये कमालीची फलंदाजी केली. या सामन्यातले नऊ चेंडूमध्ये 21 धावा केला यामध्ये त्यांनी एक षटकार आणि तीन चौकार ठोकले.
राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर तुषार देशपांडे याने संघासाठी दोन विकेट्स घेतले तर क्वेन माफका यांनी आज संघासाठी त्याच्या पहिल्याच आयपीएल 2025 च्या सामन्यात एक विकेट घेतला. रियान पराग्ने श्रेयस अय्यरला बाहेरचा रस्ता दाखवला. आकाश मडवाल याने संघाला एक विकेट मिळवून दिला