फोटो सौजन्य : BCCI
सरफराज खानचे शतक : भारताचा संघ इंग्लंडविरुद्ध मालिका सुरू व्हायला फक्त ५ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याआधी भारताचा संघ इंग्लंडमध्ये कसून मेहनत करत आहे. भारतीय संघ हा या मालिकेनंतर आता शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळताना दिसणार आहे. भारताच्या संघाने चॅम्पियन ट्रॉफी आधी झालेल्या दोन्ही कसोटी मालिकेमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर आता भारताचा संघ रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.
भारताचा संघ सध्या इंट्रा स्कॉड सामने खेळत आहे. यामध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल आणि के एल राहुल यांनी चाहत्यांचे लक्ष्य वेधले होते. त्याचबरोबर शार्दुल ठाकूरने देखील विकेट्स मिळवल्या होत्या. आता भारताचा असा खेळाडू ज्याला भारत विरुद्ध इंग्लंड या मालिकेमधून वगळण्यात आले होते पण तो भारतीय अ संघामध्ये त्याने पहिल्या सामन्यात कमालीची खेळी खेळली होती ती म्हणजेच भारतीय संघाचा फलंदाज सरफराज खान.
WTC 2025 Final : आता ‘चोकर्स’ म्हटलं तर याद राखा! चॅम्पियन Temba Bavuma गदा घेऊन हल्लाबोल, पहा Video
आता त्याच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. सरफराज खान याने भारतीय इंट्रा सामन्यात आता शतक झळकावले आहे त्याने भारतीय संघामध्ये शतक झळकावून निवडकर्त्याचे लक्ष्य वेधले आहे. एक्सप्रेस स्पोर्ट्सच्या माहितीनुसार सरफराज खान याने इंट्रा स्कॉड सामन्यात शतक ठोकले आहे. त्याला भारतीय संघामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती यावेळी त्याने शतक देखील झळकावले होते. त्यानंतर पण भारताच्या संघाला त्यामुळे मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे भारतीय संघाचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल जाण्याची स्वप्न अपुरे राहिले.
🚨 HUNDRED FOR SARFARAZ KHAN 🚨
– Sarfaraz Khan scored a Hundred in the Intra Squad match ahead of the England Test series. [Devendra Pandey from Express Sports] pic.twitter.com/1BrWKm43FL
— Johns. (@CricCrazyJohns) June 14, 2025
आता सरफराज खान याने भारतीय क्रिकेट चाहत्याचे त्याचबरोबर बीसीसीआयच्या निवडकर्त्याचे देखील त्याने लक्ष्य वेधले आहे. सरफराज खान याला इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये देखील कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. मागील काही महिन्यांपासून त्याला भारतीय क्रिकेटमध्ये त्याचबरोबर फ्रॅन्चायझींनी वगळले होते. आता त्याला मागील सामन्यांमध्ये केलेल्या कामगिरीवर संघामध्ये संधी मिळेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
भारतीय संघासाठी ही मालिका फारच महत्वाची असणार आहे. भारताच्या संघाला या मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचा सायकल सुरु होणार आहे. भारताचा संघ या मालिकेमध्ये कशी कामगिरी करेल हे पाहणे महत्वाचे ठरले.