चॅम्पियन कर्णधार टेम्बा बावुमा गदा घेऊन सेलिब्रेशन करताना(फोटो-सोशल मीडिया)
WTC 2025 Final : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामना पार पडला. या सामन्यात दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियाला हरवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा चॅम्पियन संघ बनला आहे. यासह, दक्षिण आफ्रिकेने गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर असेलला ‘चोकर्स’ नावाचा शिक्का पुसून टाकला आहे. टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली, दक्षिण आफ्रिकेने २७ वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकली.
एडेन मार्कराम, कर्णधार टेम्बा बावुमा आणि कागिसो रबाडा ही तीन खेळाडू खऱ्या अर्थाने या जेतेपदाचे खरे हीरो ठरले आहेत. या तिघांमुळेच दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या जबड्यातून विजय हिसकावून आणता आला आहे. एडेन मार्करामने २०७ चेंडूत १३६ धावा तर टेम्बा बावुमाने ६६ धावांची खेळी केली, तसेच कगिसो रबाडाने दोन्ही डाव मिळून ९ बळी टिपले. या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे जेतेपद जिंकले. या विजयानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा खूप आनंदी दिसून आला. त्यानंतर त्याने एका अनोख्या पद्धतीने सेलिब्रेशन केले आहे. ज्याचा आता व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम सामना जिंकल्यानंतर टेम्बा बावुमाच्या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यामध्ये तो आयसीसी टेस्ट गदा बंदुकीसारखी चालवत असल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, तो गोळी झाडल्याप्रमाणे ट्रॉफी फिरवत असल्याचे दिसते आहे. फोटो सेशन संपल्यानंतर, बावुमाने त्याच्या मुलासह आयसीसी ट्रॉफी घेऊन मैदानात एक फेरी मारली.
अब अगर किसी ने ‘चोकर्स’ कहा, तो बवुमा उसी गदा से वार करेंगे ⚔️🔥#WTCFinal #TembaBavuma #NoMoreChokers #SAvsAUS #ProteasWTCFinal #Cricket #viralvideo pic.twitter.com/TzqYLvOCOl
— Arpit shukla ✍🏽 (@JournoArpit) June 14, 2025
हेही वाचा : SRH ची मालकीण बांधणार लग्नगाठ! Kavya Maran च्या मनावर कोणी घातली मोहिनी? वाचा प्रेम कहाणी..
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या फायनलमध्ये विजय मिळवून, दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. यापूर्वी 1998 मध्ये, त्याने आयसीसी ट्रॉफीवर नाव कोरले होते. या काळात त्यांनी ढाका येथे झालेल्या आयसीसी नॉकआउट ट्रॉफी जिंकली होती. तेव्हापासून, हा संघ ट्रॉफीसाठी संघर्ष करत असल्याचे दिसत आला आहे. परंतु, आता मात्र दक्षिण आफ्रिका संघ आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यशस्वी झाला आहे. एकूणच, दक्षिण आफ्रिकेच्या संघावरून ‘चोकर्स’ हा शिक्का देखील पुसून टाकला आहे.