शाकिब अल हसनने मागितली देशवासियांची माफी; अखेरच्या सामन्यासाठी चाहत्यांना केले आवाहन
After Shakib Al Hasan Announced his Retirement : शाकिब अल हसन कसोटी निवृत्ती बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याने भारत दौऱ्यावरील कसोटी मालिकेदरम्यान या फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मालिकेत खेळलो तर बरे होईल अन्यथा भारतात खेळली जाणारी कसोटी कारकिर्दीतील शेवटची कसोटी सामना असेल, असे तो म्हणाला होता. यावेळी विराट कोहलीने त्याला त्याची बॅट भेट दिली होती.
शाकिबला देश सोडण्यास भाग पाडले
शाकिब अल हसनवर खुनाचा खटला सुरू आहे. कापड कारखान्यात काम करणारे रुबेलचे वडील रफिकुल इस्लाम यांनी हा गुन्हा दाखल केला होता. दाखल झालेल्या गुन्ह्यात साकिबसह 140 जणांना आरोपी करण्यात आले आहे. बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाचा खासदार होता. देशातील वातावरण खराब असून त्यामुळे साकिबलाही आपला देश सोडावा लागला आहे.
भारताच्या दिग्गज क्रिकेटरकडून बॅट गिफ्ट
KING KOHLI IS A GEM, THE PURE SOUL…!!!! ❤️
– Virat Kohli gifted his bat to Shakib Al Hasan after the match. 👌 pic.twitter.com/XghDn34tmI
— Suyog Warke🇮🇳 (@suyog_warke) October 1, 2024
विराट कोहलीकडून प्रत्येक खेळाडूचा आदर
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा खेळलेल्या प्रत्येक खेळाडूचा आदर करण्यासाठी ओळखला जातो. आपल्याच देशाचा सहकारी क्रिकेटर असो किंवा विरोधी संघाकडून खेळणारा खेळाडू असो, हा महामानव सर्वांना प्रेम देतो. नुकतेच कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतात आलेला बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन याला विराटने त्याची बॅट भेट दिली होती.
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात
बांगलादेश संघ सोमवार 21 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात करत आहे. ही मालिका सुरू होण्यापूर्वी शाकिब अल हसनने जाहीर केले होते की, जर तो घरच्या कसोटीत खेळू शकला तर बरे होईल अन्यथा तो या फॉरमॅटला अलविदा करेल. बांगलादेशातील परिस्थिती सध्या सामान्य नाही. जनतेच्या विरोधानंतर माजी पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडावा लागला. शाकिब अल हसनने आपल्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली आणि जिंकली पण आता तोही बांगलादेशातून पळून गेला आहे. त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल आहे.
घरच्या मैदानावर कसोटी मालिका
विराट कोहलीने शाकिब अल हसनला भारतातील शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी शुभेच्छा देताना त्याची बॅट भेट दिली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका खेळून त्याला निवृत्ती घ्यायची असली तरी ही संधी मिळणार नाही, हे निश्चित मानले जात होते. तसेच झाले, तो पहिल्या कसोटीत खेळत नाही कारण निषेध आणि खुनाच्या आरोपांमुळे शाकिब बांगलादेशला गेला नाही. त्यांच्या सुरक्षेबाबत सरकारनेही हात वर केले आहेत.