फोटो सौजन्य - शिखर धवन X सोशल मीडिया
शिखर धवनने केली निवृत्तीची घोषणा : भारताचा अनुभवी सलामी फलंदाज शिखर धवन बऱ्याच काळापासून भारतीय क्रिकेट संघापासून दूर आहे. बरेच वर्ष त्याला संघामध्ये स्थान मिळाले नाही. त्यामुळे अनेकजण भारतीय क्रिकेट संघावर प्रश्न उपस्थित करत होते. शिखर धवनने T२० सामना २९ जुलै २०२१ रोजी कोलंबो येथे श्रीलंकेविरुद्ध खेळला होता. या सामन्यात त्याला खातेही उघडता आले नाही. धवनने सप्टेंबर २०१८ मध्ये ओव्हल येथे इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी खेळली होती. या सामन्याच्या दोन्ही डावात तीन आणि एक धावा झाल्या. आता शिखर धवनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून निवृत्तीची घोषणा केली आहे, यामध्ये तो भावुक होताना दिसला आहे.
शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. या ३७ वर्षीय खेळाडूने २०१० मध्ये भारताकडून पदार्पण केले होते. आपल्या १३ वर्षांच्या कारकिर्दीत त्याने ३४ कसोटी, १६७ एकदिवसीय आणि ६८ T२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
शिखर धवनने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केली, यामध्ये तो भावुक होताना म्हणाला की, नमस्कार सगळ्यांना, आज एक अशा वळणावर उभा आहे. इथून जर मागे पाहिलं तर फक्त आठवणीच दिसतात आणि पुढे पाहिलं तर पूर्ण आयुष्य. माझं आधीपासून एक धैर्य होत की, भारतासाठी खेळणं… आणि ते झालं सुद्धा त्यासाठी मी बरेच लोकांना धन्यवाद बोलू इच्छितो. सर्वात आधी माझा परिवार, माझे लहानपणीचे कोच तारिक सिन्हा, मदन शर्मा त्याच्याकडून मी क्रिकेट शिकलो. त्याचबरोबर माझा संघ त्याच्यासोबत मी कितीतरी वर्ष खेळलो. मला त्यामुळे नाव मिळालं, प्रेम मिळालं पण म्हणतात ना कथेत पुढे जाण्यासाठी पानं उलटावी लागतात असं म्हणतात. बस्स, मी पण तेच करणार आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. आता या क्रिकेट प्रवासाला निरोप देताना माझ्या मनात एक शांतता आहे की मी देशासाठी दीर्घकाळ खेळलो. माझ्यावर विश्वास दाखवल्याबद्दल मी बीसीसीआय आणि डीडीसीएचे आभार मानू इच्छितो. मी माझ्या चाहत्यांचेही आभार मानतो, ज्यांनी मला भरभरून प्रेम दिले. मी स्वतःला एवढेच सांगतो की, यापुढे देशासाठी खेळणार नाही याचे दु:खी होऊ नका, तर देशासाठी खूप खेळले याचा आनंद घ्या.
As I close this chapter of my cricketing journey, I carry with me countless memories and gratitude. Thank you for the love and support! Jai Hind! 🇮🇳 pic.twitter.com/QKxRH55Lgx
— Shikhar Dhawan (@SDhawan25) August 24, 2024