आयर्लंडविरुद्ध भारताचे फलंदाज अपयशी (फोटो- सोशल मीडिया)
1. श्रेयस अय्यर: भारतीय संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे. टी 20 संघाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपविण्यात आले आहे. आयर्लंडविरुद्ध त्यांची फलंदाजी आणि नेतृत्व सपशेल अपयशी ठरले आहे. पहिल्या सामन्यात त्याने 3 तर दुसऱ्या सामन्यात त्याने 10 रन्सची खेळी केली. त्यामुळे फलंदाजीत श्रेयस अय्यर चांगली कामगिरी करू शकला नाही.
2. इशान किशन: आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा इशान किशन आयर्लंडविरुद्ध चमकू शकला नाही. पहिल्या सामन्यात त्याने केवळ 1 रन केले. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 12 रन्स केल्या. दुसऱ्या सामन्यात तो विचित्र पद्धतीने रन आउट झाला.
3. अक्षर पटेल: अक्षर पटेल टी 20 फॉर्मटमधील एक दिग्गज खेळाडू म्हणून ओळखला जातो. मात्र आयर्लंड दौऱ्यात त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला मिळाला नाही. पहिल्या सामन्यात टीएन 14 तर दुसऱ्या सामन्यात त्याने 15 रन्सची खेळी केली. फलंदाजीत देखील तो चांगली कामगिरी करू शकला नाही.
क्रिकेट जगतात खळबळ! Ireland ने भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा
4. तिलक वर्मा: तिलक वर्मा हा भारतीय टी 20 संघाचा उपकर्णधार आहे. मात्र तो देखील दोन्ही सामन्यांमध्ये फारशी चांगली खेळी करू शकला नाही. दुसऱ्या सामन्यात त्याने 55 रन्सची खेळी केली. मात्र त्यासाठी त्याला 46 बॉल्सची मदत घ्यावी लागली.
भारताविरुद्ध मालिका जिंकताच हेड कोचने दिला थेट राजीनामा
आयर्लंडच्या संघाने भारताविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकली आहे. त्यानंतर आयर्लंडचे हेड कोच हेनरीक मलान यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरी विल्सन यांना आयर्लंडचे नवे हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बेलफास्ट येथे खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये आयर्लंडने भारताचा पराभव केला आहे.
IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात
45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात आयर्लंड संघाने चांगली कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वात आयर्लंड संघाने 2022, 2024 आणि 2026 मध्ये टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश नक्की केला होता. 2022 मध्ये आयर्लंडने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला देखील पराभूत केले होते.






