आईसलँड क्रिकेटने गंभीरला केले ट्रोल (फोटो- सोशल मीडिया)
आयर्लंडकडून भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने ही लज्जास्पद कामगिरी केल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगू लागली आहे. सोशल मिडियावर मीम्स व्हायरल होत आहेत. वैभव सूर्यवंशीला एकाही सामन्यात स्थान न दिल्याने दीगज क्रिकेटपटू देखील संतापले असल्याचे समोर येत आहे.
Vaibhav Sooryavanshi ला बाहेर का बसवलं? संधी न दिल्याने Gambhir अन् Iyer ट्रोल, चाहते भडकले
आईसलँड क्रिकेटने भारताचा पराभव होताच, गौतम गंभीरबाबत एक मजेशीर पोस्ट केली आहे. आईसलँड क्रिकेटने गौतम गंभीरला डिवचले आहे. त्यामुळे सोशल मिडियावर गौतम गंभीर आणि श्रेयस अय्यर प्रचंड प्रमाणात ट्रोल झाले आहेत. तसेच अन्य दोन खेळाडूनी डेब्यू केले मात्र वैभवला संधी न दिल्याने चाहते देखील संतापले आहेत.
We can confirm that we don't wish to add Gautam Gambhir to our coaching staff. He clearly has talent, though. To take those Indian players and deliver those results in Ireland takes truly remarkable gifts. — Iceland Cricket (@icelandcricket) June 28, 2026
आईसलँड क्रिकेटची पोस्ट काय?
‘गौतम गंभीरला यांच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील करण्याची आमची अजिबात इच्छा नाही, हे आम्ही स्पष्ट करू इच्छितो. नक्कीच त्याच्याकडे टॅलेंट आहेच. एवढा मोठ्या स्टार भारतीय खेळाडूंना एकत्रित घेऊन आयर्लंडमध्ये जाऊन असा लाजिरवाणा निकाल देणे. हे खरोखरच अत्यंत थक्क करणारे आणि चांगल्या अद्भुत नेतृत्वाचे काम आहे.
गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय? ‘त्याला संधी दिली…’; सुनील गावस्करांचा जोरदार निशाणा
गंभीर-अय्यरचा Vaibhav Sooryavnshi वर अन्याय?
पहिल्या सामन्यात आणि दुसऱ्या सामन्यात 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकते असे वाटले होते. मात्र त्यांना इंटरनॅशनल डेब्यू करण्याची संधी देण्यात आली नाही. प्रिन्स यादव, सुयश शेडगे या दोन खेळाडूंचे डेब्यू झाले. मात्र आयर्लंड दौऱ्यात वैभवला संधी दिली गेली नाही. १५ वर्षांच्या युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीला प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी न दिल्यामुळे गावस्करांनी व्यवस्थापनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आयर्लंडने भारताचा 2-0 ने पराभव केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात आयर्लंडने भारताचा पराभव करण्याची पहिलीच वेळ आहे. या सिरिजमध्ये वैभव सूर्यवंशीला संधी दिली जाऊ शकत होती मात्र त्याला ती मिळाली नाही. मात्र इंग्लंडविरुद्ध त्याला पहिल्या सामन्यापासूनच संधी द्यावी लागेल.






