आयर्लंडच्या हेड कोचचा राजीनामा (फोटो- ians)
आयर्लंडच्या संघाने भारताविरुद्ध 2-0 ने मालिका जिंकली आहे. त्यानंतर आयर्लंडचे हेड कोच हेनरीक मलान यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गैरी विल्सन यांना आयर्लंडचे नवे हेड कोच म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. बेलफास्ट येथे खेळवण्यात आलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये आयर्लंडने भारताचा पराभव केला आहे.
45 वर्षांचे हेनरिक मलान हे 2027 पर्यन्त आयर्लंडचे हेड कोच असणार होते. मात्र त्याआधीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 2022 मध्ये मलान यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वात आयर्लंड संघाने चांगली कामगिरी केली. त्यांच्या नेतृत्वात आयर्लंड संघाने 2022, 2024 आणि 2026 मध्ये टी 20 वर्ल्डकप स्पर्धेत प्रवेश नक्की केला होता. 2022 मध्ये आयर्लंडने इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाला देखील पराभूत केले होते.
IND vs IRE: आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का; अव्वल स्थान धोक्यात
आयर्लंडकडून पराभवानंतर टीम इंडियाला ICC रँकिंगमध्ये धक्का
आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला दारुण पराभव पत्करावा लागला. या लाजिरवाण्या पराभवानंतर, संघाच्या आयसीसी ( ICC Rankings) क्रमवारीवर स्पष्टपणे परिणाम झाला आहे. सध्या टीम इंडिया आयसीसी टी-२० क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असली तरी, तिच्या पॉईंट्समध्ये घसरण झाली आहे. टीम इंडियाला फक्त पराभवाचा नव्हे तर ICC रँकिंगमध्ये धक्का बसला आहे. यामुळे अव्वल स्थान धोक्यात येण्याची शक्यता आहे.
टीम इंडियाने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिका खेळण्याआधी आयसीसीसी क्रमवारीत २७५ रेटिंगसह अव्वस स्थानी होती. आता, आयर्लंडसारख्या लहान देशाकडून न सलग दोन सामने गमावूनही, संघ अजूनही पहिल्या क्रमांकावर कायम आहे, पण त्याचे रेटिंग घसरले आहे. आज, २९ जून रोजी, संघाचे रेटिंग २७२ पर्यंत घसरले आहे. याचा अर्थ, दोन सामने गमावल्यानंतर संघाने तीन रेटिंग गुण गमावले आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील संघांमधील अंतरही कमी झाले आहे.






