फोटो सौजन्य – X (Sri Lanka Cricket)
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश T20 मालिकेचा पहिला सामना : श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश एकदिवसीय मालिका पार पडली, या मालिकेमध्ये श्रीलंकेच्या संघाने विजय मिळवुन दणदणीत विजय मिळवला. श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये T20 मालिकेला 10 जुलैपासुन सुरुवात झाली आहे. बांगलादेश संघ सध्या श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना काल पार पडला. यापूर्वी दोन्ही संघांमध्ये कसोटी आणि एकदिवसीय मालिका खेळली गेली होती, ज्यामध्ये श्रीलंकेने विजय मिळवला होता.
आता श्रीलंकेने टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा ७ विकेट्सने पराभव केला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. या सामन्यात श्रीलंकेच्या ३० वर्षीय फलंदाजाने बांगलादेशच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले. या सामन्यात श्रीलंकेकडून कुशल मेंडिसने अप्रतिम फलंदाजी केली.
कुशल मेंडिसने सामन्यात शानदार फलंदाजी केली आणि ५१ चेंडूत ७३ धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान मेंडिसने ५ चौकार आणि ३ शानदार षटकार मारले. त्याच्या शानदार कामगिरीमुळे कुशल मेंडिसला सामनावीर म्हणूनही निवडण्यात आले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २० षटकांत ५ गडी गमावून १५४ धावा केल्या. बांगलादेशकडून फलंदाजी करताना परवेझ हुसेनने सर्वाधिक ३८ धावा केल्या.
Unstoppable Kusal Mendis! ✨ Another format, another brilliant knock – 73 runs in the opening T20I against Bangladesh! #SLvBAN pic.twitter.com/q8SznzMsDv
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 10, 2025
याशिवाय मोहम्मद नैमने ३० धावा आणि मेहदी हसन मिरनने २९ धावा दिल्या. श्रीलंकेकडून गोलंदाजी करताना महिश थिकशनाने ४ षटकांत ३७ धावा देत सर्वाधिक २ बळी घेतले. यानंतर श्रीलंकेने हे लक्ष्य १९ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कुसल मेंडिसने ७३, पथुम निस्सांका यांनी ४२ आणि कुसल परेराने २४ धावा केल्या. बांगलादेशकडून गोलंदाजी करताना मोहम्मद शैफुद्दीन, रिशाद आणि मेहदी हसन यांनी १-१-१ विकेट घेतल्या.
VICTORY! 🎉 We’ve beaten Bangladesh by 7 wickets to take a 1-0 lead in the three-match series!
What a start to the series! Onwards and upwards, boys!👊 #SLvBAN #SriLankaCricket pic.twitter.com/jeBfiOaI7g
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 10, 2025
श्रीलंका विरुद्ध बांग्लादेश यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. 10 जुलै रोजी या मालिकेचा पहिला सामना पार पडला दुसरा सामना हा 13 जुलै रोजी खेळवला जाणार आहे. हा सामना रंगिरी दंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. श्रीलंकेच्या संघाने एकदिवसीय मालिकेमध्ये चांगली कामगिरी केली होती टी20 सामन्यात देखील चांगली सुरुवात केली आहे.