नीरज चोप्राचे कॉमनवेल्थ गेम्समध्ये यश (फोटो- ट्विटर)
भारताने आतापर्यंत कॉमनवेल्थ गेम्समध्ये 23 पदके जिंकली आहेत. रौप्यपदक जिंकल्यावर नीरज चोप्राने देखील आपली भावना व्यक्त केली आहे. ‘आज एशियाम गेम्सची आठवण झाली. यशवीरने चांगली कामगिरी केली याचा मला मनापासून आनंद आहे. मी देखील या स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. येत्या काळात अनेक स्पर्धा होणार आहेत.
त्याच्यासोबत एकाच पोडीयमवर देशाचा एकत्रित उभे राहणे हा खूप चांगला अनुभव आहे. सर्वात मोठी आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, उद्या जर मी मैदानात नसेन किंवा दुखापतीमुळे बाहेर असेन, तरीही भारताकडे आता पदके जिंकणारे उत्कृष्ट थ्रोअर्स तयार आहेत. यशवीर सिंग आता 85 मीटरच्या यादीत पोहोचला आहे.
पंतप्रधान मोदी यांनी केले नीरज चोप्राचे अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नीरज चोप्रा आणि यशवीर सिंहचे सोशल मिडियावर पोस्ट करत अभिनंदन केले आहे. ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेक प्रकारात शानदार रौप्यपदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे मनःपूर्वक अभिनंदन. त्याने पुन्हा एकदा मैदानात अप्रतिम सातत्य, संयम आणि अफाट जिद्द दाखवून दिली आहे. त्याची ही ऐतिहासिक कामगिरी पाहून भारतीयाचे मन आनंदित झाले आहे. त्याच्या पुढील प्रवासासाठी आणि आगामी स्पर्धांसाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा!”
An outstanding Silver for Neeraj Chopra in the Men’s Javelin event at Glasgow! He has once again demonstrated remarkable consistency, composure and spirit. His successes make every Indian proud. My best wishes to him for the endeavours ahead. #CWG2026@Neeraj_chopra1 pic.twitter.com/5sJjjCQg4W — Narendra Modi (@narendramodi) August 1, 2026
“राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या भालाफेकमध्ये कांस्यपदक पटकावणाऱ्या यशवीर सिंगचे खूप खूप अभिनंदन! त्याने मोक्याच्या क्षणी दाखवलेले कौशल्य आणि केलेली कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. हे यश त्याच्या कठोर परिश्रमाचे फळ आहे. भविष्यातील त्याच्या वाटचालीसाठी उज्वल शुभेच्छा!”






