(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
प्रथम फलंदाजी करताना, हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादने १५६ धावा केल्या. पण लखनौने ही धावसंख्या १९.५ षटकांत पूर्ण केली. यासाठी त्यांनी ५ गडी गमावून १५७ धावांचे लक्ष्य पूर्ण केलं. हा सामना अटीतटीचा झाला. लखनौ संघाचा कर्णधार रिशभ पंतने कर्णधार पदाला साजेशी कामगिरी केली. तो शेवटच्या क्षणापर्यंत पीचवर दटून राहिला. पंतने ६८ धावांची नाबाद खेळी केली आणि शेवटच्या षटकात तीन चौकार मारून त्याने विजय आपल्या नावावर केला.
या सामन्यात लखनौचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरला, कारण एका टप्प्यावर एसआरएचची धावसंख्या २६/४ इतकीच होती. लखनौच्या गोलंदाजांनी खतरनाक गोलंदाजी करत सुरुवातीला संघाला मजबूत कंडीशन दिली. त्यानंतर क्लासेन आणि रेड्डी यांच्यातील ११६ धावांच्या भागीदारीने संघाला १६० धावांच्या जवळ पोहोचवलं. मोहम्मद शमीने सुरुवातीलाच दोन बळी घेतले. प्रिन्स यादव आणि आवेश खान यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले. हा लखनौचा या हंगामातील पहिला विजय होता, तर एसआरएचचा तीन सामन्यांतील हा दुसरा पराभव होता.






