युएई : गुरुवारी आशिया कप स्पर्धेत बांग्लादेश विरुद्ध श्रीलंका (Bangladesh Vs Shrilanka)यांच्यात क्रिकेटचा सामना पार पडला. या सामन्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत श्रीलंकेनं बांगलादेशचा दोन विकेट्सनं पराभव केला आहे. बांग्लादेशवर विजय मिळवत श्रीलंकेने भारत (India) आणि अफगाणिस्तानच्या (Afganisthan) पाठोपाठ सुपर ४ मध्ये प्रवेश मिळवला आहे. बांग्लादेशला आशिया कपमध्ये एकही विजय मिळवता आलेला नसल्याने त्यांचे आशिया कप (Asia Cup)मधून पॅकअप झाले आहे.
बांग्लादेशने दिलेलं १८४ धावांचे आव्हान श्रीलंकेने अखेरच्या षटकात दोन गडी राखून पार केले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात सात गड्यांच्या मोबदल्यात १८३ धावा केल्या होत्या. बांग्लादेशकडून मेहदी हसन ३८ आणि अफिफ हुसेन ३९ अशी महत्वाची खेळी केली. वानिंदु हसनंगा आणि चमिका करुणारत्ने यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.
बांग्लादेशने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंका संघाने चांगली सुरुवात केली. पण नंतर ठरावीक अंतराने गडी बाद झाल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. श्रीलंका संघाकडून कुसल मेंडिस याने ६० धावांची अर्धशतकी खेळी केली. तर दासुन शनाकाने महत्वाची ४५ धावांचं योगदान दिलं. तर मोक्याच्या क्षणी असिता फर्नान्डो याने तीन चेंडूत १० धावा मिळवल्या.
आशिया कप मधील ‘ब’ गटामधून अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांनी सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. तर अ गटामध्ये भारतीय संघाने सुपर 4 मधील आपलं स्थान पक्कं केले आहे. शुक्रवारी पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील विजेता संघ सुपर चारमध्ये प्रवेश करेल. तर पराभूत संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार आहे.