कुस्ती (Wrestling) हा जगभरातील जुन्या खेळांपैकी एक आहे. मागील काही वर्षात भारतासाठी भरगोस पदकांची कमाई करणाऱ्या कुस्तीपटूंनमुळे कुस्ती हा खेळ आधुनिक काळातही अधिक नावारूपाला आला आहे. यंदा बर्लिंगहम येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही भारतीय कुस्तीपटूंनी भारताला सर्वाधिक म्हणजेच तब्बल २१ पदक पटकावून दिली. तेव्हा भारतासाठी पदक जिंकणारे कुस्तीपटू नक्की काय खातात? त्यांचा खुराक नक्की कसा असतो या सर्वांची माहिती आज आम्ही तुमच्या करीता घेऊन आलेलो आहोत.
हरियाणातील बल्लभगडचे माजी पैलवान अमित चंदीलांनी पैलवानांचा खुराक म्हणजे डाएट, व्यायाम याबद्दल एका मुलाखतीत माहिती दिली होती. ते म्हणाले, ‘कुस्तीपटूंचा आहार आणि दिनचर्या सामान्य माणसापेक्षा खूप वेगळी असते.त्यांना कुस्ती तसेच व्यायाम करताना भरपूर काकडीची आवश्यकता असलयाने कुस्तीपटू एक विशिष्ट पेय पितात ज्यामुळे ताकद येते. बदाम, पिस्ता, अक्रोड आणि काजूचे बारीक तुकडे करून त्यात काळी मिरची, पांढरी मिर्ची, पाणी, बेदाणे आणि तूप घालून एक पेस्ट केली जाते. पातळ दुधात ही सुक्या मेव्याची पेस्ट टाकतात त्यात परत तूप टाकतात. हे पेय पचायला खूप जड असतं पण ते पिल्यानंतर कुठल्याही कुस्तीपटूंचं पोट भरतं.’
दिवसाला किमान तूप…
‘सुक्या मेव्यात खूप उर्जा आणि फायबर असतं त्यामुळे ते खाल्लं की शरीरातील पोषकतत्त्वांची कमी भरून निघते आणि ताकद येते त्यामुळे शरीर मजबूत होतं. त्याचा व्यायाम करताना खूप फायदा होतो. व्हिटॅमिन आणि खनिजांचा स्रोत असलेल्या सुक्या मेव्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढत नाही त्यामुळे ते खाणं सोपं आहे. एक कुस्तीपटू दिवसाला कमीतकमी ३०० ग्रॅम तूप खातो कारण त्यामुळे त्याला ताकद मिळते. त्याचबरोबर ते दोन-तीन लिटर दूध पितात आणि सकाळ-संध्याकाळ फलाहार करतात. हे खेळाडू मुख्यत्वे सोयाबीन, पालक, ब्रोकली आणि लेट्युस या भाज्या खातात. पैलवान भरपूर भाज्या खातात पण पोळ्या मात्र प्रमाणात खातात. त्याचबरोबर एक पेहलवान आठवड्यातून तीनदा भात खातो. मीठ आणि साखरेचं प्रमाण मार्यादित असते, कारण त्यांच्या अतिसेवनाने लिव्हरचं काम बिघडू शकतं,’ असंही अमित यांनी सांगितले.
कुस्तीपटू मांसाहर करतात का?
कुस्तीपटूंच्या मांसाहाराबाबत अमित म्हणतात, ‘ शरीराला आवश्यक प्रोटिन देशी आहारातून मिळतात त्यामुळे मांसाहारावर भर दिला जात नाही. बहुतेक पेहलवान दिवसाला २०० ग्रॅम पनीर खातात. एखाद्याला वाटलं तर तो पैलवान आठवड्यात दोन-तीनदा मांसाहार करतो. आठवड्यात तीनदा खीर, गुळ आणि हलवा पैलवान खातात. कधीकधी गुळापासून तयार केलेली रबडीही खातात. कुस्तीपटू जितके कष्ट करतात तितकीच झोप त्यांना मिळणं गरजेचं असतं त्यामुळे ते दिवसा दोन तास आणि रात्री आठ तास झोप घेतात.’