अभिषेक शर्मा आणि ट्रॅव्हिस हेड : काल सनराइजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) आणि लखनौ सुपर जायंट्स (Lucknow Super Giants) यांच्यामध्ये दमदार सामना पाहायला मिळाला. IPL 2024 मध्ये सनरायझर्स हैदराबादचे फलंदाजांनी कोणतीही दयामाया दाखवली नाही. हा तोच संघ आहे ज्याने याच हंगामात 287 धावांचा विक्रम केला आहे. लखनौच्या संघाने सुरुवातीला खूप संथ सुरुवात केल्यामुळे त्यांना केलेल्या कामगिरीचे फळ भोगावे लागले. हैदराबाद संघाच्या उत्कृष्ट कामगिरीमागे ‘जय-वीरू’ जोडीचा महत्त्वाचा वाटा आहे.
हैदराबाद संघासाठी, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) आणि ट्रॅव्हिस हेड (Travis Head) चालू हंगामात फलंदाजी करत आहेत. आयपीएल 2024 च्या 57 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सचा घरच्या मैदानावर 10 विकेट्सने पराभव केला. आयपीएलच्या या हंगामात सनरायझर्स हैदराबाद हा पहिला संघ बनला आहे, ज्याने एकही विकेट न गमावता सामना जिंकण्याचा विक्रम केला आहे. अभिषेक आणि ट्रॅव्हिस यांच्यात लखनौविरुद्धही मोठी भागीदारी झाली आणि दोघांनीही अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या स्फोटक फलंदाजीने क्रिकेट विश्वात खळबळ उडवून दिली आहे. या दोघांनी मिळून केवळ 58 चेंडूत 166 धावांचे लक्ष्य गाठले. लखनौ सुपर जायंट्सने प्रथम खेळताना 165 धावा केल्या होत्या. तर ट्रॅव्हिस हेडने 30 चेंडूत 89 आणि अभिषेक शर्माने 28 चेंडूत 75 धावा केल्या. या खेळीमुळे एसआरएचने केवळ 58 चेंडूत लक्ष्य गाठले. आत्तापर्यंत सर्वात जास्त चेंडू शिल्लक असताना जिंकलेला संघ दिल्ली कॅपिटल्स आहे, ज्याने IPL 2024 मध्ये गुजरात टायटन्सला 67 चेंडू शिल्लक असताना पराभूत केले होते. आता या यादीत SRH दुसऱ्या क्रमांकावर आला आहे कारण त्याने 62 चेंडू बाकी असताना लखनौ संघाचा 10 गडी राखून पराभव केला आहे.