केएल राहुलचा नवा रेकॉर्ड (फोटो - ians)
केएल राहुलने मोडला एबी डिव्हिलियर्सचा विक्रम
दिल्ली कॅपिटल्सचा राजस्थानवर अंदणीत विजय
प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी 7 संघ मैदानात
IPL 2026/KL Rahul: आयपीएलचा अंतिम सामना होण्यासाठी केवळ 10 ते 12 दिवस उरले आहेत. 26 तारखेपासून प्ले ऑफचे सामने सुरू होणार आहेत. मात्र अद्याप टॉप 4 संघ निश्चित झाले नाहीत. आरसीबीचा संघ क्वालिफाय झाला आहे. तर अजूनही 3 जागा रिकाम्या आहेत. दिल्ली कॅपिटल्सने काल राजस्थान रॉयल्सचा पराभव केला आहे. त्या सामन्यात केएल राहुलने एक नवा विक्रम रचला आहे. त्याबाबत जाणून घेऊयात.
काल अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली विरुद्ध राजस्थान असा सामना पार पडला. अत्यंत महत्वाच्या सामन्यात दिल्लीने राजस्थानचा पराभव केला आहे. यामध्ये केएल राहुलने 56 रन्सची शानदार खेळी केली. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राहुलने राजस्थानविरुद्ध नवव्यांदा 50 हून अधिक रन्सची खेळी करत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिविलियर्सचा रेकॉर्ड मोडला.
हा सामना होण्याआधी राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वाधिक वेळेस 50 रन्स करण्याचा रेकॉर्ड एबी डिविलियर्सच्या नावावर होता. त्याने 20 डावांमध्ये 8 वेळेस कामगिरी केली. मात्र केएल राहुलने 19 डावांमध्ये 50 पेक्षा जास्त रन्स करत हा रेकोर आपल्या नावावर केला आहे.
DC vs RR: राजस्थान ‘बेहाल’! अक्षर-राहुलच्या खेळीने ‘मिशन Play Off सुरूच’, रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव
राजस्थान रॉयल्सविरुद्ध सर्वाधिक 50+ रन्स करणारे फलंदाज
केएल राहुल: 9 वेळा (19 डाव)
एबी डिविलियर्स: 8 वेळा (20 डाव)
शिखर धवन: 7 वेळा (24 डाव)
विराट कोहली: 7 वेळा (33 डाव)
केएल राहुलने कालच्या सामन्यात आपले 50 वे अर्धशतक पूर्ण केले आहे. आयपीएलमध्ये 50 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा 50 पेक्षा जास्त रन्स करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याचा समावेश झाला आहे. यामध्ये विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. तर त्या पाठोपाठ वॉर्नर, शिखर धवन, रोहित शर्मा यांचा समावेश आहे.
IPL 2026: मैदानावरच राडा! राजस्थान रॉयलचा कोच आणि रियान परागचा Live Match ड्रामा, राग चव्हाट्यावर
अक्षर-राहुलच्या खेळीने राजस्थानचा पराभव
दिल्लीच्या अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना पार पडला. राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी करताना 193 रन्स केल्या. दिल्ली कॅपिटल्सला 194 रन्सचे टार्गेट दिले होते. अभिषेक पोरेल आणि केएल राहुलने चांगली सुरूवात केली आहे. अखेर या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. त्यामुळे राजस्थानच्या याचणी वाढल्या आहेत. तर दिल्ली अजूनही आपण प्ले ऑफच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले आहे. राजस्थान रॉयल्सने दिलेल्या 194 रन्सचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सचे केएल राहुल आणि अभिषेक पोरेल हे मैदानात उतरले. दोघांनी दिल्ली कॅपिटल्सला चांगली सुरूवात करून दिली.केएल राहुलने अर्धशतकी खेळी केली. तो 56 रन्स करून आउट झाला.






