SRH Vs PBKS Live Streaming (फोटो - ians )
थोड्याच वेळात एसआरएच आणि पंजाब किंग्ज भिडणार
राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगणार सामना
अभिषेक शर्मा आणि प्रभसिमरनच्या कामगिरीकडे लक्ष
Tata IPL 2026 SRH Vs PBKS Live Toss Updates: थोड्याच वेळात राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध पंजाब किंग्ज आमनेसामने येणार आहेत. 7.30 वाजता हा सामना सुरू होणार आहे. सध्या पंजाब किंग्ज पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आणि एसआरएच तिसऱ्या स्थानावर आहे. दरम्यान (IPL 2026) आजच्या सामन्यात नुकताच टॉस झाला. पंजाब किंग्जने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे
आयपीएलचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे. आयपीएल 2026 चा हंगामातील प्ले ऑफचे शेड्यूल जाहीर झाले आहे. 31 मे रोजी अंतिम सामना होणार आहे. बंगळुरू ऐवजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये अंतिम सामना होणार आहे. दरम्यान आज एसआरएच आणि पंजाब किंग्ज टॉप 4 मध्ये असलेले आपले स्थान अधिक बळकट करण्यासाठी भिडणार आहेत.
अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, इशान किशन, हेनरी क्लासेन तर पंजाब किंग्जकडून प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर, कूपर कॉनली आणि दोन्ही संघाची गोलंदाजी देखील चांगली कामगिरी करत आहे. एसआरएचचे नेतृत्व पॅट कमिन्स तर पंजाबचे नेतृत्व श्रेयस अय्यर करत आहे.
SRH Vs PBKS Pitch Report: अभिषेकचा रुद्रावतार की युझवेंद्रच्या फिरकीची जादू; पहा पीच रीपोर्ट
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त समजली जाते. त्यामुळे आज देखील येथे मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. येथील खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेली आहे. यामुळे बॉल बॅटवर वेगाने येतो. त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जाते. या हंगामात या स्टेडियमवरील 202 ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
येथील आऊटफील्ड देखील अत्यंत वेगवान स्वरूपाची आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते झेवियर बार्टलेट आणि अर्शदीप सिंग सारखे गोलंदाज याचा फायदा घेऊ शकतात. ही खेळपट्टी फिरकीपटूंना फारशी मदत करत नाही. फिरकीपटूंना रन्स रोखण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. आजच्या सामन्यात पुन्हा एकदा 200 पेक्षा जास्त रन्स पाहायला मिळू शकतात. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, प्रभसिमरन सिंग , श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या हे जबरदस्त फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहेत. तर प्रफुल हिंगे, पॅट कमिन्स आणि पंजाबचे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आजचा सामना अत्यंत रोमांचक आणि मोठ्या धावसंख्येचा पाहायला मिळू शकतो.
पत्ता कट! Hardik Pandya मुंबई पलटणमध्ये नसणार? RCB विरुद्धच्या हाय व्होल्टेज सामन्यात…
एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, सलिल अरोरा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, लियाम लिविंगस्टोन, प्रफुल हिंगे.
पंजाब किंग्जची संभाव्य टीम:प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग / नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अझमतुल्ला ओमरझाई, मार्को यानसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.






