SRH Vs PBKS Pitch Report (फोटो- istockphoto)
सनरायझर्स हैदराबाद अन् पंजाब किंग्ज आमनेसामने
अभिषेक शर्मा विरुद्ध अर्शदीप सिंग रंगणार सामना
राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर होणार मॅच
Tata IPL 2026 SRH Vs PBKS Live Updates: आयपीएलचा महासंग्राम क्रिकेट चाहत्यांना रोज नवनवीन गोष्टी पाहण्याची संधी देत आहे. आज राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्ज असा सामना होणार आहे. टॉप्स 4 मध्ये आपले स्थान अधिक मजबूत करण्यासाठी आज दोन्ही संघ (IPL 2026) आमनेसामने येतील. आजच्या सामन्याच्या आधी पीच रिपोर्टबद्दल जाणून घेऊयात.
काय आहे आजचा पीच रिपोर्ट?
राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी उपयुक्त समजली जाते. त्यामुळे आज देखील येथे मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते. येथील खेळपट्टी लाल आणि काळ्या मातीपासून तयार करण्यात आलेली आहे. यामुळे बॉल बॅटवर वेगाने येतो. त्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जाते. या हंगामात या स्टेडियमवरील 202 ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.
येथील आऊटफील्ड देखील अत्यंत वेगवान स्वरूपाची आहे. सुरुवातीच्या काही ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते झेवियर बार्टलेट आणि अर्शदीप सिंग सारखे गोलंदाज याचा फायदा घेऊ शकतात. ही खेळपट्टी फिरकीपटूंना फारशी मदत करत नाही. फिरकीपटूंना रन्स रोखण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.
IPL 2026 Playoff Schedule: बंगळुरूचा झाला गेम! आता ‘या’ ठिकाणी होणार महामुकाबला, पहा शेड्यूल
सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे दव पडल्यास फरक पडू शकतो. या स्टेडियमवर 15 पैकी 10 सामन्यात चेस करणाऱ्या संघाचा विजय झाला आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊ शकतो. पंजाब किंग्स सध्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असून त्यांनी मागील सामन्यात हैदराबादचा पराभव केला होता. सनरायझर्स हैदराबाद सध्या तिसऱ्या क्रमांकावर असून घरच्या मैदानावर त्यांचा रेकॉर्ड अत्यंत मजबूत आहे.
आजच्या सामन्यात पुन्हा एकदा 200 पेक्षा जास्त रन्स पाहायला मिळू शकतात. ट्रेविस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, प्रभसिमरन सिंग , श्रेयस अय्यर, प्रियांश आर्या हे जबरदस्त फॉर्ममध्ये फलंदाजी करत आहेत. तर प्रफुल हिंगे, पॅट कमिन्स आणि पंजाबचे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे आजचा सामना अत्यंत रोमांचक आणि मोठ्या धावसंख्येचा पाहायला मिळू शकतो.
IPL 2026 मध्ये वैभव सूर्यवंशीचा धुमाकूळ; फक्त 43 रन्स करताच ‘हा’ रेकॉर्ड होणार नावावर
एसआरएचची संभाव्य टीम: ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नीतीश कुमार रेड्डी, अनिकेत वर्मा, सलिल अरोरा, हर्ष दुबे, शिवांग कुमार, हर्षल पटेल, ईशान मलिंगा, लियाम लिविंगस्टोन, प्रफुल हिंगे.
पंजाब किंग्जची संभाव्य टीम:प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), शशांक सिंग / नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, अझमतुल्ला ओमरझाई, मार्को यानसेन, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.






