RR Vs PBKS Pitch Report (फोटो- सोशल मिडिया)
पंजाब किंग्ज विरुद्ध राजस्थान रॉयल्समध्ये लढाई
पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेण्याची राजस्थानचा प्रयत्न
वैभव सूर्यवंशी विरुद्ध अर्शदीप सिंग सामना रंगणार
Tata IPL 2026 RR Vs PBKS Live Updates: आज संध्याकाळी आयपीएलचा 40 वा सामना होणार आहे. चंदीगडमध्ये हा सामना होणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना सुरू होईल. आयपीएलमध्ये रोज चाहत्यांना नवनवीन रोमांचक सामने पाहायला मिळत आहे. कालचा सामना तर अगदी वेळेच्या आत संपला. दरम्यान आजचा सामना (RR Vs PBKS) चंदीगडला होणार आहे, त्या स्टेडियमवरील पीच रिपोर्टबाबत जाणून घेऊयात.
काय आहे पीच रिपोर्ट?
चंदीगडची खेळपट्टी यंदाच्या हंगामात फलंदाजांसाठी अत्यंत पूरक ठरली आहे. 2026 च्या आयपीएलमध्ये या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 211 इतकी आहे. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स आणि वेग असल्याने चेंडू बॅटवर व्यवस्थित येतो. ज्यामुळे फलंदाजांना मोठे फटके मारणे सोपे जाते. आजच्या सामन्यातही 180 ते 200 पेक्षा जास्त रन्सचा डोंगर उभा राहण्याची शक्यता आहे.
या खेळपट्टीवर फलंदाजांसाठी फायदा असला तरी देखील, सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये गोलंदाजांना या ठिकाणी मदत मिळू शकते आकडेवारीनुसार या मैदानात फिरकीपटूंच्या गोलंदाजीपेक्षा वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. रात्रीच्या सामन्यात ‘दव’ ही मोठी भूमिका बजावू शकते. रात्रीचया वेळेस या ठिकाणी 9 नंतर दव पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथ गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
पंजाबचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी आहे. तसेच पंजाब किंग्ज आतापर्यंत एकही सामना पराभूत झालेला नाही. केकेआरविरुद्ध सामना पावसामुळे रद्द झाल्यामुळे दोन्ही संघाना प्रत्येकी 1-1 गुण दिला गेला आहे. त्यामुळे आजचा सामना टॉप 4 मध्ये असलेल्या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. त्यामुळे टॉप 4 मध्ये आपले स्थान मजबूत करण्यासाठी आजचा सामना दोन्ही संघांसाठी महत्वाचा असणार आहे.
पंजाब किंग्जची संभाव्य टीम: प्रभसिमरन सिंह, प्रियांश आर्या, कूपर कोनोली, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, शशांक सिंह, मार्कस स्टोइनिस, झेवियर बार्टलेट, मार्को जानसन, विजयकुमार वैसाख, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह.
मनु भाकरला विचारला Vaibhav Sooryavanshi बाबत प्रश्न, भडकले चाहते; शेअर केला व्हिडिओ
राजस्थान रॉयल्सची संभाव्य टीम: यशस्वी जयसवाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिम्रोन हेटमायर, डोनोवन फरेरा, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नंद्रे बर्गर, तुषार देशपांडे, ब्रिजेश शर्मा , रवी बिश्नोई.






