कोहली अन् गिल येणार आमनेसामने (फोटो- सोशल मिडिया)
विराट कोहली अन् शुभमन गिलच्या कामगिरीकडे लक्ष
धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर होणार क्वालिफायर 1
आजचा सामना जिंकणाऱ्या संघाला अंतिम फेरीचे तिकीट
Tata IPL 2026 GT Vs RCB Qualifier 1 : आज संध्याकाळी 7.30 वाजता हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा क्रिकेट स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्समध्ये क्वालिफायर 1 चा सामना होणार आहे. आज जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीत जाणार आहे. त्यामुळे आज प्रत्येक संघ विजयाच्या तयारीनेच मैदानात उतरलेला दिसून येईल. मात्र आज दोन दिग्गज देखील आमनेसामने येणार आहेत. विराट कोहली आणि शुभमन गिल आज खेळताना दिसणार आहेत.
आज संध्याकाळी महामुकाबला होणार आहे. गुजरात आणि बंगळुरू आमनेसामने येणार आहेत. मात्र सामना मोठा असला तरी दोन महत्वाचे खेळाडू आज खेळताना दिसणार आहेत. कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली आज मैदानात दिसणार अहरत. दोन्ही खेळाडू सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. एक किंग आहे तर दुसरा खेळाडू प्रिन्स म्हणून ओळखला जातो. आजच्या सामन्यात दोघांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
कर्णधार शुभमन गिल आणि विराट कोहली हे सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार शुभमन गिलने यंदा आयपीएल 2026 मध्ये 616 रन्स केल्या आहेत. तर विराट कोहलीने 557 रन्स केल्या आहेत. कोहलीचा धावगतीचा वेग चांगला आहे. मात्र शुभमन गिलने रन्स जास्त केल्या आहेत. त्याने गेल्या काही सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे.
RCB: आता लक्ष्य फक्त फायनलचं! RCB इतिहासाची पुनरावृत्ती करणार? प्लेऑफमधील आकडेवारी काय सांगते?
या हंगामात RCB ने दमदार प्रदर्शन करत पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. संघाने १४ पैकी ९ सामने जिंकले, तर ५ सामन्यांत पराभव पत्करला. १८ गुणांसह आरसीबीने पहिल्या स्थानावर कब्जा केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचेही १८ गुण होते, मात्र नेट रनरेटमध्ये आरसीबीने दोन्ही संघांना मागे टाकले. गतविजेते आरसीबी आता आणखी एका अंतिम फेरीच्या दिशेने वाटचाल करत आहेत. संघाची सध्याची फॉर्म आणि प्लेऑफमधील अनुभव पाहता, यंदाही आरसीबी विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानली जात आहे.
RCB Vs GT Qualifier 1: रन्सचा पाऊस की पाण्याचा जोर? बंगळुरू अन् गुजरात सामन्यावर पाऊस पाणी फिरवणार?
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध गुजरात टायटन्स क्वालिफायर 1 मध्ये भिडणार आहेत. टॉप 2 मध्ये असणार हे संघ आज आमनेसामने आले आहेत. आज जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीत दाखल होणार आहे. तसेच पराभूत झालेल्या संघाला एलिमिनेटरमध्ये जिंकणाऱ्या संघाशी खेळावे लागणार आहे. मात्र आजच्या सामन्यात पावसाने हजेरी लावल्यास काय होईल ते पाहुयात.






