फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
रणजी ट्रॉफी सेमीफायनल : भारताचा संघ दुबईमध्ये चॅम्पियन ट्रॉफी खेळत आहे, तर दुसरीकडे रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. रणजी ट्रॉफीमध्ये आता सेमी फायनल सामने खेळवले जात आहेत. त्याच वेळी, नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात आणि केरळ यांच्यात उपांत्य सामना खेळला जात आहे, या सामन्यात वाद पाहायला मिळाला. ज्यामध्ये कन्कशन सबस्टिट्यूटवरून वाद सुरू होताना दिसत आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी, गुजरात संघाने कन्कशन सब्स्टिट्यूटचा वापर केला आणि एका खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले. ज्यावर केरळच्या कर्णधाराने नाराजी व्यक्त केली.
WPL 2025 : भारताच्या दोन दिग्गज महिला खेळाडू भिडणार! स्मृती मानधना आणि हरमनप्रीत कौर आमनेसामने
भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-२० मालिकेतही, कन्कशन सबस्टिट्यूटवरून वाद निर्माण झाला होता. जेव्हा शिवम दुबेच्या जागी हर्षित राणा खेळताना दिसला. रणजी ट्रॉफीमध्ये गुजरात आणि केरळ यांच्यात खेळल्या जाणाऱ्या उपांत्य सामन्यातूनही असेच एक प्रकरण समोर येत आहे. या सामन्यादरम्यान, गुजरातचा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोईच्या चेहऱ्यावर चेंडू लागला. त्यानंतर, या सामन्यात रवी बिश्नोईच्या जागी अष्टपैलू हेमांग पटेलला कन्कशन पर्याय म्हणून गुजरात संघात समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर, गुजरातकडून फलंदाजी करताना, हेमांगने पहिल्या डावात ४१ चेंडूंचा सामना करत २७ धावा केल्या.
Might not impact Gujarat as much in the remainder of this game but Ravi Bishnoi has been ruled out of the match with a concussion during fielding yesterday. Seamer Hemang Patel has taken his spot in the XI. #RanjiTrophy pic.twitter.com/ppui3c1QSz
— Lalith Kalidas (@lal__kal) February 20, 2025
खरं तर, कन्कशन सबस्टिट्यूट अंतर्गत, गोलंदाजाच्या जागी गोलंदाज, फलंदाजाच्या जागी फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूच्या जागी अष्टपैलू खेळाडूचा संघात समावेश केला जातो, परंतु गुजरात आणि केरळ यांच्यातील सामन्यात, कन्कशन सबस्टिट्यूट अंतर्गत गोलंदाजाच्या जागी अष्टपैलू खेळाडूचा समावेश केल्यामुळे केरळच्या कर्णधाराने निराशा व्यक्त केली होती. रवी बिश्नोई हा एक फिरकी गोलंदाज आहे आणि तो ९ व्या किंवा १० व्या क्रमांकावर फलंदाजीला येतो. याशिवाय, रवी बिश्नोईच्या जागी कन्कशन पर्याय म्हणून संघात समाविष्ट करण्यात आलेला हेमांग पटेल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. त्यामुळे या नियमावरून मोठ्या प्रमाणात मागील काही दिवसांपासून वाद पाहायला मिळाले.
चौथ्या दिवसाच्या खेळाअखेर, प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातने ७ विकेट्स गमावून ४२९ धावा केल्या होत्या. यापूर्वी, केरळने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४५७ धावा केल्या होत्या.