फोटो सौजन्य - BCCI Women
भारत विरुद्ध श्रीलंका सामन्याचा अहवाल : भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये ट्राय सिरीज चा फायनल चा सामना पार पडला. या सामन्यात भारताचे संघाने कमालीची कामगिरी करत श्रीलंकेला घरचा मैदानावर ९७ धावांनी पराभूत केले आहे. आजचा सामन्यामध्ये सुरुवातीपासूनच भारताच्या संघाचा दबदबा पहायला मिळाला. सामन्यांमध्ये त्याचबरोबर या मालिकेमध्ये देखील भारतीय महिला संघाचा या मालिकेत दबदबा पाहायला मिळाला आहे. आजच्या सामन्यांमध्ये भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने नाणेफेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये टीम इंडियाने पहिले फलंदाजी करत सात विकेट गमावून ३४२ धावा केल्या होत्या.
प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ २४५ धावाच करू शकला. यामध्ये आजच्या सामन्यात कौतुकास्पद कामगिरी स्मृती मानधना आणि स्नेह राणा हिने केली. स्मृतीने तिच्या करिअरचे एक दिवसीय क्रिकेटमधील अकरावे शतक झळकावले. तर स्नेह राणा हिने तिच्या फिरकीची जादू दाखवली आणि संघासाठी चार विकेटची कमाई केली. आजच्या या सामन्यांमध्ये दोन्ही संघांची कामगिरी कशी होती यावर एकदा नजर टाका. भारतीय संघाच्या गोलंदाजी बद्दल सांगायचे झाले तर अमरज्योत कौर हिने आजच्या सामन्यात चार विकेट्स घेतले यामध्ये तिने हसिनी परेरा, विष्णी गुणरत्ने आणि हर्षित सामरविक्रमा या तीन महत्त्वाच्या खेळाडूंची विकेट मिळून संघाला चांगला स्थितीत उभे केले.
Victory by 9⃣7⃣ runs in the Final 🙌
Congratulations to #TeamIndia as they beat Sri Lanka to win the #WomensTriNationSeries2025 👏👏
Scorecard ▶️ https://t.co/rVyie6SUw9#INDvSL pic.twitter.com/U1YCGD9Uw3
— BCCI Women (@BCCIWomen) May 11, 2025
स्नेह राणा हिने संघासाठी चार विकेट्स घेतले. यामध्ये तिने नीलाक्षी डिसेल्वा, अनुष्का संजीवनी, कर्णधार चामरी अथपथ्थु आणि मालकी मधेरा या चार मजबूत फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला. प्रतीका रावल आणि स्मृती मानधना यांनी कर्णधाराचा निर्णय पूर्णपणे बरोबर असल्याचे सिद्ध केले. दोघांनीही १४.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ७० धावा जोडल्या. प्रतीकाने ४९ चेंडूत ३६ धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत असताना, हरलीन देओलने ४७ धावा केल्या आणि मानधनासोबत दुसऱ्या विकेटसाठी शंभर धावांची भागीदारी केली.
IPL 2025 चा थरार पुन्हा रंगणार! तारीख ठरली… या दिनी होणार सामान्यांना सुरुवात, वाचा सविस्तर माहिती
मंधानाने १०१ चेंडूंचा सामना करत ११६ धावांची शानदार खेळी केली. या खेळीदरम्यान स्मृतीने १५ चौकार आणि दोन षटकार मारले. कर्णधार हरमनप्रीत कौरने ३० चेंडूत ४१ धावा केल्या तर जेमिमा रॉड्रिग्जने २९ चेंडूत ४४ धावा केल्या. दीप्ती शर्माने शेवटच्या षटकांमध्ये १४ चेंडूत नाबाद २० धावा करत संघाला एकूण ३४२ धावांपर्यंत पोहोचवले.