दिव्या देशमुख(फोटो-सोशल मीडिया)
Women’s Chess World Champion : भारताची १९ वर्षीय महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने नुकताच विश्वचषक जिंकून इतिहास रचला आहे. दिव्याने आपल्याच देशाची अनुभवी खेळाडू कोनेरू हम्पीला टायब्रेकरमध्ये पराभूत करून विजेतेपद खिशात टाकले आहे. दिव्याने हम्पीला हरवून सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. या विजयानंतर दिव्याने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणाली की, तिच्याकडे गमावण्यासारखे काहीही नव्हते आणि मिळवण्यासारखे बरेच काही आहे.
या विजयानंतर ग्रँडमास्टर दिव्या देशमुख म्हणाली की, “हम्पीविरुद्ध फिडे महिला विश्वचषक फायनल खेळत असताना तिच्यावर कोणताही दबाव नसल्याचे तिने म्हटले आहे. तिने सांगितले की, “माझ्याकडे गमावण्यासारखे काही एक नव्हते, म्हणून मला खेळताना कोणताही दबाव जाणवला नाही.” दिव्या बुधवारी जॉर्जियातील बटुमी येथून नागपूरला पोहोचली. विश्वविजेत्या दिव्याचे भव्य स्वागत केले आहे. विमानतळावर तिचे स्वागत करण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती.
हेही वाचा : IND vs ENG : ओव्हल कसोटी सामन्यात पावसाचा लपंडाव; भारताची स्थिती नाजूक, साहेबांचा टिच्चून मारा
जेव्हा दिव्याला विचारणा करण्यात आली, की अंतिम फेरीत तिच्यावर काही दबाव होता का? तेव्हा तिने ‘पीटीआय व्हिडिओज’ला सांगितले की, “मला असे वाटले नाही की मी काही अडचणीत आहे. मला वाटते की तिने (हम्पी) केलेली शेवटची चूक, ज्यामुळे मी जिंकली. मी फक्त माझ्या कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत होते. मी इतर कोणत्याही गोष्टीचा विचार करत नव्हती.”
दिव्याने या स्पर्धेत एक अंडरडॉग म्हणून प्रवेश केला होता. दिव्याचे ध्येय ग्रँडमास्टर नॉर्म जिंकणे होते आणि अखेर ती ग्रँडमास्टर बनली आहे. दिव्याने केवळ ग्रँडमास्टर नॉर्म मिळवले नाही तर स्पर्धा देखील जिंकली आणि पुढच्या वर्षी कॅंडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे. तसेच या विजयासह तिने US $ 50,000 ची बक्षीस रक्कम देखील जिंकली आहे.
दिव्याला आशा आहे की तिच्या या यशानंतर, महिला बुद्धिबळ भारतात खूप लोकप्रियता मिळेल. दिव्या म्हणाली की, “मला आशा आहे की या यशानंतर, महिला, विशेषतः तरुण खेळाडू, हा खेळ मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाईल आणि काहीही अशक्य नाही असे स्वप्न पाहायला लागतील.”
दिव्या पुढे म्हणाली की, “तरुण पिढीसाठी नाही, तर त्यांच्या पालकांसाठी माझा एक संदेशया सेल, की त्यांनी त्यांच्या मुलांना मनापासून पाठिंबा द्यावा कारण त्यांना त्यांच्या अपयशाच्या काळात त्यांची सर्वात जास्त गरज असते, यशाच्या वेळी नाही.” बुधवारी रात्री विमानतळावर पोहोचल्यावर दिव्याने आपल्या यशाचे श्रेय तिच्या पालकांना दिले आहे.