फोटो सौजन्य - इंस्टाग्राम
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचे खेळाडू किती : पॅरिस ऑलिम्पिकला ४ दिवसाहून कमी दिवस शिल्लक राहिले आहेत. २६ जुलै रोजी पॅरिस ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. यासाठी पॅरिसमध्ये मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. यंदा भारतीय खेळाडू जास्तीत जास्त पदक जिंकतील अशा भारतीय चाहत्यांच्या आशा आहेत. यंदा भारताचे ११७ खेळाडू सहभागी झाले आहेत. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा २५ जुलैपासून सुरु होणार आहे तर उद्घाटन सोहळाचे २६ जुलैला आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे किती खेळाडू या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत यावर एकदा नजर टाका.
महाराष्ट्राचे पाच खेळाडू पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळणार आहेत. यामध्ये उंच उडी इव्हेंटमध्ये सर्वेश कुशारे, आंतरराष्ट्रीय स्तरावर दमदार कामगिरी करणारा बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी, स्वप्नील कुसळे ५० मीटर रायफल शूटिंग, तिरंदाजीमध्ये प्रवीण जाधव जाधव आणि महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळेला ३००० मीटर स्टीपलचेस स्पर्धेत पदक मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे.
भारताचा उंच उडी इव्हेंटमध्ये सहभागी होणारा सर्वेश कुशारे हा मूळचा नाशिकमधील देवरगाव येथील आहे. त्याने आतापर्यत आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई खेळांमध्ये रौम्य पदक मिळवले होते.
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी दुहेरी पुरुष बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभागी होतो. चिराग शेट्टी याचा जोडीदार सात्विकसाईराज रंकीरेड्डी यांच्यासोबत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दिसणार आहेत. सात्विक आणि चिराग हे दोघे १० आठवड्याहून अधिक दिवस जागतिक क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर होते. त्याचबरोबर त्याच्या दोघांच्या नावावर अनेक विक्रम आहेत.
महाराष्ट्राचा स्वप्नील कुसळे याने आशियाई खेळांमध्ये ५० मीटर रायफलमध्ये सुवर्ण पदक जिंकले आहे. तो मूळचा कोल्हापूरचा आहे.
भारताचा स्टार धावपटू अविनाश साबळे याच्या नावावर अनेक विक्रम आहेत. त्याने आशियाई खेळांमध्ये अनेक विक्रम केले आहेत. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये त्याने नॅशनल रेकॉर्ड सुद्धा मोडला आहे. अविनाशने आशियाई खेळांमध्ये दोन पदक जिंकली आहेत तर कॉमनवेल्ट खेळामध्ये त्याने १ पदक जिंकले आहे.
भारताचा स्टार तिरंदाज प्रवीण जाधव हा मूळचा सातारा जिल्ह्यामधील आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने सांघिक रजत पदक जिंकले होते.






