IPL 2022: IPL 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, स्पर्धेतील जुन्या 8 संघांनी 27 खेळाडूंना कायम ठेवले होते, परंतु यातील अनेक खेळाडू खराब फॉर्ममुळे संघातून बाहेर पडले आहेत. हे खेळाडू संघासाठी काहीही योगदान देऊ शकले नाहीत. आयपीएल 2022 साठी या खेळाडूंना करोडो रुपये दिले गेले.

राजस्थान रॉयल्सचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आयपीएल 2022 मध्ये फक्त तीन सामने खेळला आहे, या सामन्यांमध्ये त्याने 25 धावा केल्या आहेत. तो संघाला दमदार सुरुवात करून देऊ शकला नाही. याच कारणामुळे कर्णधार संजू सॅमसनने त्याला संघातून वगळले.

दिल्ली कॅपिटल्सचा गोलंदाज एनरिचने आयपीएल 2022 मध्ये फक्त एकच सामना खेळला आहे. दिल्लीने 6.50 कोटी देऊन एनरिच (Anrich Nortje) ला आपल्या संघासोबत जोडले होते. पण हंगाम सुरू होण्याआधी, (एनरिक नॉर्टजे) हिपच्या दुखापतीने त्रस्त होता. या दुखापतीचा परिणाम त्याच्या खेळावरही दिसून आला.

सनरायझर्स हैदराबादचा (SRH) गोलंदाज अब्दुल समदला संघाने 4 कोटी रुपये देऊन सामील केले, परंतु अब्दुलला आयपीएल 2022 मध्ये फक्त दोन सामने खेळण्याची संधी मिळाली आणि तो एकही बळी घेऊ शकला नाही. याच कारणामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.

व्यंकटेश अय्यर आयपीएल 2022 मध्ये अत्यंत खराब फॉर्मशी झुंज देत आहे. त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. धावा काढण्यासाठी त्याला क्रीजवरही थांबता येत नाही. अय्यरने चालू हंगामात खेळल्या गेलेल्या 9 सामन्यांमध्ये 16.50 च्या सरासरीने फक्त 132 धावा केल्या आहेत. या मोसमात त्याच्या बॅटने फक्त 1 अर्धशतक झळकावले आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध कर्णधार श्रेयस अय्यरने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला. केकेआरने व्यंकटेश अय्यरला 8 कोटी रुपयांना रिटेन केले.

भारतीय खेळपट्ट्या नेहमीच फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरल्या आहेत, परंतु वरुण चक्रवर्ती या खेळपट्ट्यांवर कमाल दाखवू शकला नाही. आयपीएल 2022 मध्ये तो अतिशय खराब फॉर्मशी झुंज देत आहे. IPL 2022 च्या 8 सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीने फक्त 4 विकेट घेतल्या आहेत.






