फोटो सौजन्य - Gujarat Titans सोशल मीडिया
IPL 2025 Points Table: आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठीची स्पर्धा रोमांचक बनली आहे. गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या विजयासह गुजरातने प्लेऑफकडे वाटचाल केली आहे. आतापर्यत या स्पर्धेचे ४० सामने झाले आहेत. यामध्ये युवा खेळाडूंनी कमालीचा खेळ दाखवला आहे. त्यांच्यबरोबर मेगा ऑक्शनमध्ये झालेल्या या उलटफेर नंतर संघाचे कर्णधार बदलले आणि त्याचा फायदा देखील अनेक खेळाडूंना त्याचबरोबर संघाला झाला आहे. ४० सामन्यानंतर सध्या आयपीएल २०२५ च्या गुणतालिकेची स्थिती काय आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
इंडियन प्रीमियर लीगच्या गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर गुजरात टायटन्सच्या संघाने आतापर्यत ८ सामने खेळले आहेत, यामध्ये त्यांनी ८ पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवल्यास शुभमन गिलची सेना अंतिम चारमध्ये पोहोचेल. त्याच वेळी, दिल्ली कॅपिटल्स देखील चांगल्या स्थितीत आहे आणि संघाचे १० गुण झाले आहेत. आरसीबी देखील प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. बंगळुरूच्या संघाने रजत पाटीदारच्या नेतृत्वात या सीझनमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. आरसीबीचा संघ सध्या गुणतालिकेमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे, तर चौथ्या स्थानावर पंजाब किंग्सचा संघ आहे. पंजाबच्या संघाने या सीझनमध्ये चांगली सुरुवात केली होती पण त्यांना मागील सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे.
IPL 2025 POINTS TABLE. 📈
– GT ruling with 12 Points. pic.twitter.com/wwQKHIWM74
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 21, 2025
या सीझनमध्ये गुणतालिकेत पाचव्या स्थानावर लखनौ सुपर जायंट्सचा संघ आहे. रिषभ पंतचा संघ ८ सामने खेळाला आहे यामध्ये त्यांनी ५ सामन्यात विजय मिळवला आणि ३ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आज त्यांचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ सलग तीन विजयानंतर सहाव्या स्थानावर आहे. तर सातव्या स्थानावर कोलकाता नाईट राइडर्सचा संघ आहे. आठव्या स्थानावर ४ गुणांसह राजस्थान रॉयल्सचा संघ आहे.
तथापि, आता चेन्नई सुपर किंग्जसाठी शेवटच्या चार संघात पोहोचणे खूप कठीण झाले आहे. सीएसकेला उर्वरित सर्व सहा सामन्यांमध्ये विजयाची चव चाखावी लागेल, तरच संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल. सनरायझर्स हैदराबादची परिस्थितीही अशीच आहे. ७ सामन्यांपैकी एसआरएचने फक्त २ सामन्यात विजय मिळवला आहे. जर तुमच्या संघाला प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर पॅट कमिन्सच्या सैन्याला उर्वरित सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल.