फोटो सौजन्य : ICC
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ चा अंतिम सामना ११ जूनपासून सुरू होत आहे. ५ दिवस चालणाऱ्या या निर्णायक सामन्यासाठी १६ जून हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. हा सामना ऐतिहासिक सामना असणार आहे. या सामन्याचा विजेता हा येत्या पाच दिवसांमध्ये मिळणार आहे. आता ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील वर्ल्ड टेस्ट क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर खेळला जाणार आहे हा ऐतिहासिक सामना ऐतिहासिक मैदानावर होणार आहे.
अशा परिस्थितीत चाहत्यांच्या मनात प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत की लॉर्ड्सच्या खेळपट्टीची स्थिती काय असेल. तसेच सामन्यादरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पावसामुळे खेळपट्टीची स्थिती किती बदलू शकते. लंडनमधील लॉर्ड्स मैदानाची खेळपट्टी कशी असणार आहे यासंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
कमी वयात क्रिकेटला अलविदा करणाऱ्या खेळाडूंवर टाका नजर! या क्रिकेटपटूने घेतली होती 27 वर्षात निवृती
लॉर्ड्सचे ऐतिहासिक मैदान सहसा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती देते. या मैदानावर शेवटचा कसोटी सामना सप्टेंबर २०२४ मध्ये खेळला गेला होता. या सामन्यात जो रूटने शतक झळकावले. या शतकामुळे इंग्लंड संघाने श्रीलंकेचा १९० धावांनी पराभव केला. लंडनमधील या मैदानावर चेंडूमध्ये भरपूर स्विंग दिसून येते. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाज फलंदाजांच्या अडचणी वाढवू शकतात. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता असते, त्यामुळे खेळपट्टीवर ओलावा दिसून येतो. तथापि, सामना जसजसा पुढे जाईल तसतसे फलंदाज खेळात प्रवेश करतील.
The stage is set, the captains are ready 🤝
It’s the ICC World Test Championship Final!
🗓 11 – 15 June 2025
⏰ 11h30 CAT
🏟️ Lord’s Cricket Ground, LondonWe are ready for the true Test of Character! 🏏🇿🇦#WTC25 #WTCFinal #ProteasWTCFinal pic.twitter.com/tbdYJtVwPT
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 8, 2025
लॉर्ड्सवरील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या ३१०, दुसऱ्या डावात २९९, तिसऱ्या डावात २५६ आणि चौथ्या डावात १५७ धावा आहेत. येथे चौथ्या डावात फलंदाजी करणे अजिबात सोपे असणार नाही. आतापर्यंत लॉर्ड्सवर एकूण १४७ कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. या काळात प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ५३ सामने जिंकले आहेत. तसेच, नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने ४३ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.