बर्मिंगहम येथे सुरु असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेचा रविवारी दहावा दिवस आहे. दहाव्या दिवशी भारताच्या ४५ पदकांबाबत निर्णय होणार असून भारताला रविवारी क्रिकेट, ऍथलेटिक्स, बॉक्सिंग, टेबल टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकायची संधी आहे. बॉक्सिंगमध्ये निकहत झरीन नीतू आणि अमित सुवर्णपदकासाठी प्रयत्न करतील. तर टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल त्याच्या जोडीदारांसह अंतिम फेरीत असतील. क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.
१० व्या दिवसाचे शेड्युल :
भारतीय महिला हॉकी संघ :
भारत विरुद्ध न्यूझीलंड (कांस्यपदक सामना) दुपारी १:३० वा
बॅडमिंटन :
पी व्ही सिंधू (महिला एकेरी उपांत्य फेरी) दुपारी २. २० मि.
लक्ष्य सेन (पुरुष एकेरीची उपांत्य फेरी) दुपारी ३. ३० मि.
किदंबी श्रीकांत (पुरुष एकेरीची उपांत्य फेरी) दुपारी ३. १० मि.
ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद (महिला दुहेरी उपांत्य फेरी) दुपारी ४. ००
ऍथलेटिक्स:
अब्दुल्ला, अल्डोस पॉल, प्रवीण चित्रवाल (पुरुष ट्रिपल जंप अंतिम सामना) दुपारी २:४५ मि.
अमित, संदीप कुमार (पुरुष १०००० मीटर रेस वॉक) दुपारी ३:५० मि.
अनु राणी, शिल्पा राणी (महिला भालाफेक अंतिम सामना) दुपारी ४:०५ मि.
डीपी मनू, रोहित यादव (पुरुष भालाफेक अंतिम) दुपारी १२:१५ मि.
बॉक्सिंग :
नीतू (महिला ४५-४८ किलो गट अंतिम सामना) दुपारी ३ वा.
अमित पंघाल (पुरुष ४८-५१ किलो गट अंतिम सामना) दुपारी ३:१५ मि.
निकहत झरीन (महिला ४८-५१ किलो गट अंतिम सामना) संध्याकाळी ७ वा.
सागर ( पुरूष ८२ किलो+ वटन गट अंतिम सामना) दुपारी १:१५ वा.
टेबल टेनिस :
श्रीजा अकुला (महिला एकेरी कांस्यपदक सामना) दुपारी ३:३५ मि.
अचंता शरथ कमल आणि गणनासेकरन साथियां (पुरुष दुहेरी सुवर्णपदक सामना) संध्याकाळी ६:१५ मि.
अचंता शरथ कमल (पुरुष एकेरीची उपांत्य फेरी) रात्री ९:५० मि.
अचंता शरथ कमल आणि श्रीजा अकुला (मिश्र दुहेरी सुवर्णपदक सामना) दुपारी १२:१५ मि.
क्रिकेट:
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (महिला क्रिकेट सुवर्णपदक सामना) रात्री ९:३० मिं.
स्क्वॅश :
दीपिका पल्लीकल आणि सौरव घोषाल (मिश्र दुहेरी कांस्यपदक सामना) रात्री १०:३० मि.