सिडनी : टी२० विश्वचषक स्पर्धेत आज २९ ऑक्टोबर रोजी न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका हा सामना रंगणार आहे. दोन्ही संघाचे आतापर्यंत प्रत्येकी दोन सामने झाले असून श्रीलंकेने एका सामन्यात विजय मिळवला आहे तर एक सामना गमावला आहे. न्यूझीलंडने सलामीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला मात दिली असून त्यांचा एक सामना अनिर्णीत राहिला आहे.
ऑस्ट्रेलिया येथील सिडनी क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका हा सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी १:३० वाजता हा सामना सुरु होणार असून यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिझनी + हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग प्रेक्षकांना पाहता येणार आहे. काल पावसामुळे इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड हे दोन्ही सामने रद्द करण्यात आले होते.