फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने या स्पर्धेमध्ये पहिल्या दोन सामन्यांमध्ये दमदार खेळ दाखवून आरसीबी चाहत्यांना खुश केले होते. तर मुंबई इंडियन्सच्या संघाला पहिल्याच सामन्यांमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. आज पुन्हा मुंबईच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सकडून बदला घेण्याची संधी असणार आहे. मुंबई इंडियन्सचा संघ आज स्पर्धेमध्ये चौथा विजय घेण्याच्या उद्देशाने हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात उतरणार आहे. तर दिल्ली कॅपिटल्सचा संघ मेग लॅनिंगच्या नेतृत्वात आज मैदानात उतरेल.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामन्याचे आयोजन बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात आले आहे. गुणतालिकेवर नजर टाकली तर मुंबई इंडियन्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. मुंबईच्या संघाचे ४ सामने झाले आहेत यामध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीच्या संघाने महिला प्रीमियर लीगचे ५ सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी ३ सामन्यांमध्ये विजय मिळवला आणि २ सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तिसऱ्या स्थानावर स्मृती मानधना म्हणजेच आरसीबीचा संघ आहे. आरसीबीच्या संघाने सुरुवात चांगली केली होती पण मागील झालेले तीनही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना आज म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन एम चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्यात आले आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल, तर सामान्यांच्या अर्ध्या तासाआधी म्हणजेच ७ वाजता नाणेफेक होणार आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहू शकतात. तर मोबाईलवर पाहणारे प्रेक्षक या सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar अॅपवर पाहता येणार आहे.
पुढील स्टेशन 📍: Chinnaswamy Stadium for #DCvMI#AaliRe #MumbaiIndians #TATAWPL pic.twitter.com/3tSWTm087s
— Mumbai Indians (@mipaltan) February 28, 2025
ॲलिस कॅप्सी, मेग लॅनिंग (कर्णधार), सारा ब्राइस, ॲनाबेल सदरलँड, मिन्नू मणी, शेफाली वर्मा, अरुंधती रेड्डी, एन चरणी, शिखा पांडे, जेमिमाह रॉड्रिग्स, नंदिनी कश्यप, स्नेहा दीप्ती, जेस जोनासेन, निकी प्रसाद, तानिया भाटिया, मार्चिया भाटिया, सारा प्रसाद राधा, तानिया भाटिया.
अक्षिता माहेश्वरी, हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, अमनदीप कौर, हेली मॅथ्यूज, सायका इशाक, अमनजोत कौर, जिंतीमणी कलिता, सजीवन सजना, अमेलिया केर, कीर्थना बालकृष्णन, संस्कृती गुप्ता, इस्मेल डे, क्लोरीन, क्लोरीन, क्लोरीन, संस्कृती गुप्ता. कमलिनी, नताली सायव्हर-ब्रंट, यास्तिका भाटिया