रोहित शर्मा आणि सचिन तेंडुलकर(फोटो-सोशल मीडिया)
India vs Australia ODI series : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS ) यांच्यात उद्यापासून म्हणजे १९ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांमध्ये आतापर्यंत फक्त एकाच फलंदाजाला द्विशतक झळकावता आलेले आहेत. शिवाय, दोन्ही संघांमधील खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये सर्वोत्तम डावांच्या यादीत भारतीय खेळाडूंनी आपला दबदबा राखला आहे. आतापर्यंतच्या पाच सर्वोत्तम डावांपैकी तीन डाव भारतीय फलंदाजांनी आपली छाप पडली आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया सामने नेहमीच फलंदाजीच्या दृष्टिकोनातून रोमांचक आणि महत्त्वाचे राहिलेले आहेत. दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अनेक वेळा अफलातून कामगिरी करत क्रिकेटप्रेमींचे मनोरंजन केले आहे. परंतु भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यात पाच फलंदाजांनी सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.
हेही वाचा : Pak Afghan War : PCB ने निर्लज्जपणाचा गाठला कळस; अफगाणी खेळाडूंच्या मृत्यूनंतर म्हणाले, “बदलीचा विचार करत…”
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय इतिहासात द्विशतक झळकावणारा एकमेव फलंदाज हा भारतीय खेळाडू आहे. रोहित शर्मा हा द्विशतक झळकावणारा एकमेव फलंदाज आहे. त्याने २ नोव्हेंबर २०१३ रोजी बेंगळुरू येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात १५८ चेंडूंमध्ये २०९ धावांची खेळी खेळली होती. त्याने आपल्या खेळीत १६ षटकार आणि १२ चौकार लगावले होते. भारताने ६/३८३ धावांचा डोंगर उभा केला होता, परिणामी ऑस्ट्रेलियाला ५७ धावांनी पराभव पत्करावा लागला होता.
मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ५ नोव्हेंबर २००९ रोजी हैदराबादमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध १४१ चेंडूंचा सामना करून ४ षटकार आणि १९ चौकारांसह १७५ धावा केल्या होत्या. भारताने हा सामना ३ धावांनी गमावला होता.
रोहित शर्माने १२ जानेवारी २०१६ रोजी वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६३ चेंडूंचा सामना करत त्याने नाबाद १७१ धावांची खेळी केली होती. यामध्ये त्याने ७ षटकार आणि १३ चौकार लगावले होते. भारताने यावेळी ३ विकेट गमावत ३०९ धावा उभ्या केल्या होत्या. तर प्रत्युत्तरादाखल, कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१४९) च्या शानदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना ५ विकेट राखून विजय मिळवला होता.
३० ऑक्टोबर २०१३ रोजी नागपूर येथे खेळवण्यात आलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणून जॉर्ज बेलीने ११४ चेंडूंचा सामना करत १५६ धावा केल्या होत्या. त्याने त्याच्या खेळीत ६ षटकार आणि १३ चौकार मारले होते. ऑस्ट्रेलियन संघाने भारतासमोर ३५१ धावांचे लक्ष्य दिले होते. जे भारताने ६ गडी राखून गाठले होते.
हेही वाचा : IND vs AUS : ‘हिटमॅन’ची बॅट रचणार विक्रम! Rohit Sharma ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीमापार करेल प्रत्येक चेंडू अन्…
भारतीय फलंदाज रोहित शर्माच्या नाबाद १७१ धावांच्या जोरावर भारताने ३ गडी गमावून ३०९ धावा उभ्या केल्या होत्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ४९.२ षटकांत ५ गडी राखून सहज विजय मिळवला. वाका मैदानावर ऑस्ट्रेलियन कर्णधाराने १३५ चेंडूंमध्ये २ षटकार आणि ११ चौकारांच्या मदतीने १४९ धावांची वादळी खेळी होती.