फोटो सौजन्य - ICC Cricket World Cup
2025 Women’s Cricket World Cup : आयसीसी महिला विश्वचषक 2025 चे शेवटचे दोन साठे सामने आज खेळवले जाणार आहेत. आजचा पहिला सामना हा इंग्लंड महिला संघ विरुद्ध न्यूझीलंड महिला संघ यांच्यात खेळवला जाणार आहे. या सामन्याचे आयोजन हे विशाखापटनम येथील एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम या मैदानावर होणार आहे. तर दुसरा सामना हा भारत महिला संघ विरुद्ध बांगलादेश महिला संघ यांच्यात रंगणार आहे हा सामना नवी मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर होणार आहे.
सर्व संघाचे आज शेवटचे साखळी सामने खेळवले जाणार आहेत. कालच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने कमालीची कामगिरी केली. अलाना हिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि सात विकेट्स घेतल्या. तिच्या करिष्माई गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने त्यांच्या शेवटच्या लीग स्टेज सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर सात विकेट्सने शानदार विजय मिळवला. हा सामना कधी आणि कुठे पाहताय ना या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्या.
इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये होणारा सामना हा भारतीय वेळेनुसार सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे या सामन्याच्या अर्ध्या तासा आधी म्हणजेच 10.30 मिनिटांनी या सामन्याचे नाणेफेक होईल. हा सामना विशाखापटनम येथील एसीए – व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टेलिव्हिजनवर पाहणाऱ्य़ा प्रेक्षकांसाठी हा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चैनल वर हा सामना पाहता येणार आहे तर त्या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओहॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
Kicking off today’s huge #CWC25 double header 👊 How you can watch #CWC25 📲 https://t.co/MNSEqhJhcB pic.twitter.com/5gcaGi7Gdt — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 25, 2025
भारतीय महिला संघाचा हा शेवटचा सामना आज दुपारी 3 वाजता सुरू होणार आहे या सामन्याच्या अर्ध्या तासा आधी म्हणजेच 2.30 मिनिटांनी या सामन्याचे नाणेफेक होईल. बांगलादेशी संघाने पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यानंतर संघाला संघाच्या हाती एकही विजय लागलेल्या नाही. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कची चैनलवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहेत तर लाईव्ह स्ट्रिमिंग ही जिओहॉटस्टर वर पाहायला मिळणार आहे.
An epic contest to sign off from the League Stage at #CWC25 🔥 How to watch 📲 https://t.co/MNSEqhJP29 pic.twitter.com/ac7WXGfu58 — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 26, 2025






