फोटो सौजन्य - ICC Cricket World Cup
ऑस्ट्रेलिया महिला संघ विरुद्ध साऊत आफ्रिका महिला संघ यांच्यामध्ये महिला विश्वचषकाचा 26 वा सामना पार पडला या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिले गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 97 धावांवर गुंडाळला. या सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाची फिरकी गोलंदाज अलाना किंग ही स्टार ठरली. ऑस्ट्रेलियासाठी सात विकेट्स घेऊन दमदार गोलंदाजी करून दक्षिण आफ्रिका विरुद्ध सामना एकतर्फी केला आणि 98 धावांचे लक्ष हे ऑस्ट्रेलियाच्या संघाने या विश्वचषकामध्ये एकही सामना न गमावता पहिल्या स्थानावर फिनिश केले आहे.
आयसीसी महिला विश्वचषक 2025 चा गुणतालिकेबद्दल सांगायचे झाले तर दुसऱ्या स्थानावर दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सात सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर दोन सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तिसरा स्थानावर इंग्लंडचा संघ आहे इंग्लंडच्या संघाने सहा सामन्यांमध्ये चार सामन्यात विजय मिळवला आहे तर एक सामना त्यांचा पराभव झाला आहे तर एक सामना हा पावसामुळे वाहून गेला होता. इंग्लंडचा आणखी एक सामना आज खेळवला जाणार आहे हा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.
सेमी फायनलमध्ये क्वालिफाय झालेला चौथा संघ हा भारत आहे भारताच्या संघाने आतापर्यंत सहा सामन्यांमध्ये तीन विजय मिळवल्या आहेत तर तीन पराभवांना सामोरे जावे लागले आहे. भारताचा शेवटचा सामना हा आज खेळवला जाणार आहे हा सामना बांगलादेश विरुद्ध रंगणार आहे. श्रीलंका न्यूझीलंड पाकिस्तान आणि बांगलादेश हे चारही संघ सेमी फायनलच्या शर्यतीतून बाहेर झाले आहेत. 26 ऑक्टोबर रोजी महिला विश्वचषक २०२५ चे दोन शेवटचे साखळी सामने खेळवले जाणार आहेत त्यानंतर सेमी फायनलची सामन्यांची लढत सुरू होणार आहे.
Australia sews up top spot at #CWC25 🪡 🇦🇺 How to watch the semi-finals 📲 https://t.co/MNSEqhJP29 pic.twitter.com/JoBDxPIrB0 — ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 26, 2025
सेमीफायनलचे चार संघ पक्के झाले आहेत. भारताचा संघ हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सेमीफायनलचा सामना खेळणार आहे. तर इंग्लड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये पहिला सेमीफायनलचा सामना खेळवला जाणार आहे. या दोन्ही सामन्यामध्ये जे संघ विजयी होणार आहेत ते संघ फायनलमध्ये जेतेपदासाठी लढणार आहेत.






