IND U19 vs AUS U19: आयपीएलमध्ये आपल्या स्फोटक कामगिरीने सगळ्याना वेड लावणारा वैभव सुर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) ऑस्ट्रेलियामध्ये कहर केला आहे. भारताच्या १९ वर्षांखालील आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघांमधील दुसरा युवा एकदिवसीय सामना ब्रिस्बेन येथे खेळला जात आहे. या सामन्यात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने धमाकेदार खेळी केली. त्याने संपूर्ण सामन्यात चौकार आणि षटकारांचा वर्षाव केला. यामुळे आता युवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने आता १९ वर्षांखालील विश्वचषकात टीम इंडियाला विजय मिळवून देणारा कर्णधार उन्मुक्त चंदला मागे टाकले आहे.
Vaibhav Suryavanshi breaks Unmukt Chand’s record of most career sixes in Youth ODI cricket Check: 👉🏻 https://t.co/PI5mbKFiCj pic.twitter.com/N7087ryKh7 — CricTracker (@Cricketracker) September 24, 2025
वैभव सूर्यवंशी आता युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय खेळाडू बनला आहे. त्याच्याकडे आता युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये ४१ षटकार आहेत. हे ४१ षटकार अतिशय जलद गतीने मारले गेले आहेत. उन्मुक्त चंदने युवा क्रिकेटमध्ये २१ सामन्यांत ३८ षटकार मारले आहेत, तर वैभव सूर्यवंशीने फक्त १० सामन्यांत ४१ षटकार मारले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या युवा एकदिवसीय सामन्यात वैभवने धमाकेदार खेळी केली आणि ६८ चेंडूत ७० धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान, वैभवने 5 चौकार आणि 6 षटकार मारले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना, भारताच्या १९ वर्षांखालील संघाने ४९.४ षटकांत ३०० धावा केल्या. टीम इंडियाकडून फलंदाजी करताना, यष्टीरक्षक-फलंदाज अभिज्ञान कुंडूने ६४ चेंडूत ७१ धावा केल्या, ज्यात ५ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. विहान मल्होत्रानेही ७४ चेंडूत ७० धावा केल्या. कर्णधार आयुष मते पुन्हा एकदा धावा काढण्यात अपयशी ठरला, एकही बळी न घेता बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून गोलंदाजी करताना, विल बायरमने १० षटकांत ४७ धावा देत सर्वाधिक ३ बळी घेतले. कर्णधार यश देशमुखनेही ४ षटकांत ३१ धावा देत २ बळी घेतले.