फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आजपासून कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. भारताचे खेळाडू सध्या कसोटी मालिका खेळण्यामध्ये व्यस्त आहेत तर आता काही दिवसांमध्ये टी20 विश्वचषक देखील सुरु होणार आहे त्यासाठी संघाची जोरदार तयारी सुरु आहे. भारतामध्ये काही देशातंर्गत स्पर्धा देखील खेळवल्या जात आहेत. २६ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या या हंगामाच्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी भारताचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याची तामिळनाडू संघाचा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
खरं तर, वरुण चक्रवर्तीने नुकत्याच संपलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत शानदार कामगिरी केली होती, ज्यामध्ये त्याने तीन सामन्यांमध्ये एकूण ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्याला आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी तामिळनाडू संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नारायण जगदीसन त्याचे उपकर्णधार म्हणून काम पाहतील. डावखुरा फिरकी गोलंदाज आर. साई किशोर आणि उदयोन्मुख खेळाडू आंद्रे सिद्धार्थ यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
भारताचा डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन देखील संघाचा भाग आहे. या हंगामात रणजी करंडकात तामिळनाडूची सुरुवात सामान्य राहिली आहे. संघाला एलिट ग्रुप डी मध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यामध्ये राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड, कर्नाटक, त्रिपुरा, झारखंड आणि सौराष्ट्र सारखे संघ आहेत. तामिळनाडू अहमदाबादमध्ये राजस्थानविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करेल.
🚨 BREAKING 🚨 Varun Chakaravarthy has been appointed as the captain of Tamil Nadu for the Syed Mushtaq Ali Trophy 2025. 🏆#Cricket #Varun #SMAT #TamilNadu pic.twitter.com/txfkYDssDM — Sportskeeda (@Sportskeeda) November 13, 2025
वरुण चक्रवर्ती (कर्णधार), नारायण जगदीसन (उपकर्णधार, यष्टिरक्षक), तुषार रायझा (यष्टीरक्षक), व्हीपी अमित सात्विक, शाहरुख खान, आंद्रे सिद्धार्थ, प्रदोष रंजन पॉल, शिवम सिंग, आर साई किशोर, एम सिद्धार्थ, टी नटराजन, ए. गुरव सिंग, आर साई किशोर, एम सिद्धार्थ, टी नटराजन, ए. आर सिलंबरासन, एस रितिक इसवरन (यष्टीरक्षक)






