विराट कोहली(फोटो-सोशल मीडिया)
virat kohli test retirement : एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील परिस्थिति चिघळताना दिसत आहे. तर दुसरीकडे रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली. त्याच्या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. रोहितच्या निवृत्तीनंतर भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या निवृत्तीच्या घोषणेने त्याच्या चाहत्यांच्या पदरी घोर निराशा पडली आहे.
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज फलंदाजांपैकी एक असणारा आणि माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यामुळे, १४ वर्षांनंतर भारतीय चाहत्यांचे हृदय पुन्हा चुरचुर झाले आहे. कारण ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेने टीम इंडियाच्या ३ दिग्गजांच्या कारकिर्दीला सुरुंग लावला आहे.
रोहित शर्माच्या कसोटीतून निवृत्तीच्या घोषणेनंतर गेले ३ दिवस झाले, विराट कोहली देखील कसोटी क्रिकेटला अलविदा म्हणनर असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. एका मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात अल होता की, कोहलीने बीसीसीआयला याबाबत माहिती दिली होती. त्याला समजावण्याचे प्रयत्न देखील सुरू असल्याची चर्चा होती. पण त्याचे मन वळवण्यात कुणाला यश आले नाही. त्याचा काही परिणाम असा की अखेर विराट कोहलीने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली. सोमवार, १२ मे रोजी, विराटकडून सोशल मीडियावर चाहत्यांना दिलेल्या संदेशात कसोटी क्रिकेटमधील त्याच्या प्रवासाच्या शेवटाची घोषणा करण्यात आली.
विराट कोहली आपली शेवटची कसोटी मालिका ऑस्ट्रेलियामध्ये खेळला. जिथे त्याने आपल्या दमदार शतकाने सुरुवात केली पण नंतर तो सतत अपयशी ठरत गेला. अशाप्रकारे, भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा त्याच इतिहासाची पुनरावृत्ती झाली. जो १४ वर्षांपूर्वी घडला होता. पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियाचा कसोटी दौरा हा भारतीय क्रिकेट दिग्गजांच्या कारकिर्दीचा शेवट ठरला आहे. फक्त विराटच नाही, तर ५ कसोटी सामन्यांची ती मालिका भारतीय क्रिकेटमधील ३ दिग्गजांसाठी त्याच्या कसोटी कारकिर्दीचा शेवट करणारी ठरली.
काही दिवसांपूर्वी माजी कर्णधार रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. तोही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सुपर फ्लॉप ठरला होता आणि त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलिया मालिकेच्या मध्यभागी, तिसऱ्या कसोटीनंतर, महान अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने देखील त्याच्या कसोटी कारकिर्दीला राम राम ठोकला होता.
हेही वाचा : IPL 2025: आयपीएल दरम्यान DC ला मोठा झटका! ‘या’ वेगवान गोलंदाजाने भारतात परतण्यासाठी दिला स्पष्ट नकार..
तेव्हा देखीलआस एकह काही झाले..
२०११-१२ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय चाहत्यांना झालेल्या १४ वर्षांच्या जुन्या जखमा पुन्हा वर आल्या आहेत. त्यानंतर माजी कर्णधार राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण, जे त्यांच्या कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात होते, ते देखील ऑस्ट्रेलियामध्ये आपला खेळ दाखवू शकले नाहीत. तिथे ते अपयशी ठरले. त्या दौऱ्यानंतर दोघांनीही क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या दोघांव्यतिरिक्त, माजी कर्णधार एमएस धोनीची कसोटी कारकीर्द देखील २०१३-१४ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्याने शेवटची ठरवली.