झिम्बाब्वे वि अफगाणिस्तान संघ(फोटो-सोशल मीडिया)
Zimbabwe vs AFG Test : कसोटी क्रिकेट युगात झिम्बाब्वेसाठी पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. झिम्बाब्वेने अफगाणिस्तान कसोटी सामन्यात पराभूत केले आहे. या सामन्यात झिम्बाब्वेने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत त्यांनी कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय आपल्या नावावर नोंदवला. झिम्बाब्वे अफगाणिस्तानचा एक डाव आणि ७३ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा हा तिसरा डावातील विजय ठरला आहे आणि हा विजय संघाचे सर्वात संस्मरणीय यश असल्याचे मानले जात आहे.
हरारे येथे खेळवण्यात आलेल्या या कसोटी सामन्यात, अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना फक्त १२७ धावाच उभारू शकला. रहमानउल्लाह गुरबाजने संघाकडून सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. त्यानंतर, झिम्बाब्वेने फलंदाजी करताना ३५९ धावांचा मोठा आकडा गाठला. झिम्बाब्वेकडून बेन करनने १२१ धावांची शानदार खेळी साकारली, तर सिकंदर रझाने ६५ धावा काढल्या.
झिम्बाब्वेच्या गोलंदाजीमुळे दुसऱ्या डावातह देखील अफगाणिस्तानच्या फलदाजांची चांगलीच दैना उडवली आणि त्यांना फक्त १५९ धावाच करता आल्या. अफगाणिस्तानकडून इब्राहिम झद्रानने ४२ आणि बशीर शाहने ३२ धावा करून संघाला थोडे सावरले. परंतु एकूण धावसंख्या झिम्बाब्वेच्या पहिल्या डावापेक्षा देखील खूपच कमी होती. परिणामी, झिम्बाब्वेने सामना एक डाव आणि ७३ धावांनी आपल्या नावे केला.
या विजयासह झिम्बाब्वेने कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. झिम्बाब्वे संघाने यापूर्वी दोनदा डावाने विजय मिळवला होता. ज्यात १९९५ मध्ये झिम्बाब्वेने पाकिस्तानला एक डाव आणि ६४ धावांनी धूळ चारली होती. त्यानंतर, २०२१ मध्ये त्यांनी बांगलादेशला एक डाव आणि ३२ धावांनी पराभूत केले होते. उल्लेखनीय बाब म्हणजे, झिम्बाब्वेने जवळजवळ १२ वर्षांनी मायदेशात कसोटी सामना आपल्या खिशात टाकला आहे. त्यांचा शेवटचा घरचा विजय २०१३ मध्ये बांगलादेशविरुद्ध आला होता.
हेही वाचा : Women World Cup 2025 : पाकिस्तान संघाला मोठा झटका! ICC विश्वचषकातील पराभवानंतर PCB उचलले मोठे पाऊल
झिम्बाब्वेसाठी हा विजय खुप महत्वाचा ठरला आहे. हा विजय केवळ विक्रमाच्या दृष्टीने महत्त्वाचा नसून संघाचा आत्मविश्वास आणि देशांतर्गत क्रिकेटची पातळी देखील दर्शविणारा आहे. या विजयाने प्रेक्षक आणि चाहते खूप उत्साहित झाले आहेत.