वॉशिंग्टन सुंदरचा 100 विकेट्सचा रेकॉर्ड (फोटो- ians/ट्विटर)
वॉशिंग्टन सुंदरचा 100 विकेट्सचा रेकॉर्ड
फलंदाजीत देखील सुंदरने लगावले अर्धशतक
अफगणिस्तान विरुद्ध भारताची पकड मजबूत
India vs Afghanistan Live 2026: सध्या भारत विरुद्ध अफगणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना सुरू आहे. भारताने प्रथम 564 रन्सवर आपला डाव घोषित केला. त्यानंतर अफगणिस्तान 152 वर ऑल आउट झाला. भारताने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला आहे. मात्र या सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने दुहेरी शानदार कामगिरी केली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील त्याने 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे.
भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने शानदार गोलंदाजी आणि फलंदाजी केली आहे. वॉशिंग्टन सुंदरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 100 विकेट्सचा टप्पा पूर्ण केला आहे. फॉलोऑन दिल्यावर गोलंदाजी करताना टी ब्रेकपर्यन्त वॉशिंग्टन सुंदने 3 विकेट घेत अफगणिस्तानचे कंबरडे मोडले आहे. असाच फॉर्म त्याने फलंदाजीत देखील दाखवला आहे.
Edged and caught! ☝️ Washington Sundar gets his second wicket as Shubman Gill takes a fine catch at slip 🙌 Updates ▶️ https://t.co/Au50EfVM30#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank | @Sundarwashi5 | @ShubmanGill pic.twitter.com/z3FQv9om3p — BCCI (@BCCI) June 8, 2026
भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या एकमेव कसोटी सामन्यात वॉशिंग्टन सुंदरने इतिहास रचला आहे. वॉशिंग्टन सुंदरने त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील १०० विकेट्सचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. वॉशिंग्टन सुंदरने गोलंदाजी आणि फलंदाजीत आपले योगदान दिले आहे. वॉशिंग्टन सुंदरने फलंदाजी करताना 62 बॉलमध्ये 52 रन्सची शानदार खेळी केली.
टीम इंडियाकडून अफगाणिस्तानवर फॉलोऑनची नामुष्की
अफगणिस्तानचा संघ 368 रन्स चा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र भारताच्या स्पिनर्स गोलंदाजांनी अचूक मारा करत अफगणिस्तानला 152 रन्सवर रोखले. अफगणिस्तानकडून रहमत शाहने 60 रन्सची खेळी केली. तर हशमतुल्ला शाहिदीने 20 रन्स केल्या. तर भारताकडून प्रसिद्ध कृष्णाने 3 विकेट्स घेतल्या, तर पहिलाच कसोटी सामना खेळणाऱ्या मानव सुथारने एकूण 6 अफगणिस्तान फलंदाजांना तंबूत परत पाठवले.
IND Vs AFG Live: भारताच्या वाघांपुढे ‘पठाण’ ढेर! टीम इंडियाकडून अफगाणिस्तानवर फॉलोऑनची नामुष्की
अफगणिस्तानचा संघ 152 रन्सवर ऑल आउट झाला. त्यानंतर भारतीय संघाने अफगणिस्तानला फॉलोऑन दिला आहे. सध्या अफगणिस्तानचा संघ 92 रन्सवर असून त्यांनी 3 विकेट गमावल्या आहेत. सेदिकुल्ला अटल 41 रन्सवर खेळत आहे. तर अब्दुल मलिक 8 रन्स करून आउट झाला. भारतकडून कुलदीप यादव आणि सुंदर या स्पिनर्सने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
IND vs AFG: कसोटी पदार्पणातच मानव सुथारचा ‘सिक्सर’, 152 धावांमध्येच अफगाणिस्तानचा फडशा
मानव सुथारने सहा बळी घेतले
भारतासाठी मानव सुथार स्टार ठरला. आपल्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात त्याने भेदक गोलंदाजी करत पहिल्या डावात सहा बळी घेतले. त्याने संघासाठी एकूण २२ षटके गोलंदाजी केली. दरम्यान, त्याने १.५० च्या इकॉनॉमी रेटने अब्दुल मलिक (१६), रहमानुल्ला गुरबाज (१२), रहमत शाह (६०), अफसर झाझाई (०३), शराफुद्दीन अश्रफ (११) आणि मोहम्मद सलीम (००) यांच्या विकेट्स घेतल्या. केवळ ३३ धावा देत त्याने ६ बळी घेतले आहेत. जागतिक स्तरावरही मानव सुथारच्या खेळीचे कौतुक आहे.






