Alu Vadi Recipe : अळूवडी खायला कुणाला आवडत नाही? कोणथ्या सणसमारंभात किंवा खास प्रसंगी मराठी घरात कुरकुरीत अळूवडी नक्की बनवली जाते. पांरपारिक रेसिपीची मदत घेऊन तुम्ही घरीच या पदार्थाला तयार करु शकता.
(फोटो सौजन्य: Pinterest)
Follow Us:
Follow Us:
विस्तार
अळूवडी हा महाराष्ट्राचा पारंपारिक पदार्थ आहे.
अळूच्या पानांत बेसणाचे सारण भरून ही वडी तयार केली जाते.
खास प्रसंगी तुम्ही घरी ही रेसिपी ट्राय करु शकता.
महाराष्ट्रातील पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांमध्ये अळूवडीला विशेष स्थान आहे. पावसाळ्याच्या दिवसांत किंवा सणासुदीच्या वेळी अनेक घरांमध्ये हा पदार्थ आवर्जून तयार केला जातो. आंबट, गोड, तिखट आणि खमंग अशा सर्व चवींचा सुंदर मिलाफ अळूवडीत अनुभवायला मिळतो. गरमागरम चहासोबत नाश्त्यासाठी, सायंकाळच्या खाण्यासाठी किंवा जेवणातील साइड डिश म्हणून आळूवडी उत्तम पर्याय ठरते. योग्य प्रमाणात मसाले वापरून बनवलेली ही पारंपरिक रेसिपीघरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते.
अळूची पाने स्वच्छ धुवून कोरडी करा. पानांवरील जाड शिरा सुरीच्या मदतीने हलक्या हाताने काढून पाने सपाट करून घ्या.
एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, तीळ, मीठ, चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. थोडे-थोडे पाणी घालून घट्ट, गुळगुळीत मिश्रण तयार करा.
एक मोठे पान पसरवून त्यावर बेसनाचे मिश्रण समान पसरवा. त्यावर दुसरे पान ठेवून पुन्हा मिश्रण लावा. अशाच प्रकारे 3 ते 4 पानांचे थर तयार करा.
दोन्ही बाजू आत दुमडून घट्ट सुरळी तयार करा. उरलेल्या पानांपासूनही याच पद्धतीने सुरळ्या तयार करा.
सुरळ्या वाफेवर 20 ते 25 मिनिटे शिजवा. पूर्णपणे शिजल्यानंतर त्या थंड होऊ द्या आणि नंतर समान आकाराचे काप करा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, तीळ आणि कढीपत्ता घाला. त्यात अळूवडीचे काप घालून दोन्ही
बाजूंनी हलके सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत परता.
तयार आळूवडीवर किसलेले खोबरे आणि चिरलेली कोथिंबीर भुरभुरवा. गरमागरम आळूवडी चटणी, टोमॅटो सॉस किंवा चहासोबत सर्व्ह करा.
Web Title: Make traditional maharashtrian style alu vadi recipe in marathi