फोटो सौजन्य - x सोशल मीडिया
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया चॅम्पियन ट्रॉफी सामना : आज चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला जाणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघांनी १-१ सामना खेळला आहे आणि दोन्ही संघांनी विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अफगाणिस्तानला पराभूत केले होते तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने इंग्लंडला हरवले आहे. अशा परिस्थितीत, आजचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीसाठी जवळजवळ पात्र ठरेल. आजचा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा असणार आहे. ग्रुप अ मधून भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ सेमीफायनलसाठी पात्र झाले आहेत.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. ऑस्ट्रेलियाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला हरवले, तर दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला हरवले. आता क्रिकेट चाहत्यांच्या नजरा आजच्या सामन्यावर असणार आहेत. आजचा हा दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणारा सामना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर माहिती वाचा.
रावळपिंडीच्या मैदानावर आज सामना रंगणार आहे, या सामन्यात आज खूप धावा होण्याची अपेक्षा आहे, ही खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली मानली जाते. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हाय स्कोअरिंग सामना होण्याची अपेक्षा आहे. तुम्ही भारतातील हा सामना स्टार स्पोर्ट्सवर पाहू शकता, जिथे सामना थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग JioHotstar वर असेल, जिथे तुम्ही सामना मोफत पाहू शकता.
Australia take on South Africa ⚔️
Both chasing a semifinal spot. Who will book their berth first? 🤔 @DineshKarthik & @Parthiv9 preview, on Cricbuzz Live#CT2025 #AUSvsSA pic.twitter.com/uaxuE8eHKj
— Cricbuzz (@cricbuzz) February 25, 2025
रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत २७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ११ वेळा आणि दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने १५ वेळा विजय मिळवला आहे. अशा परिस्थितीत, नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करू इच्छितो. या मैदानावर आतापर्यंतचा सर्वोच्च स्कोअर ३३७ धावांचा आहे, जो न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध बनवला होता.
आतापर्यंत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात एकदिवसीय क्रिकेटमध्ये ११० सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ५५ सामने दक्षिण आफ्रिकेने आणि ५१ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले. या दोन्ही संघांची शेवटची टक्कर २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकात झाली होती, जेव्हा ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.