फोटो सौजन्य - बीसीसीआय
IND W vs SA W Live Streaming : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरू होणारा महिला विश्वचषकाचा फायनलचा सामना हा काही तासांमध्ये सुरू होणार आहे. भारताचे संघाने महिला क्रिकेट मधील बलाढ्य संघ त्याचबरोबर महिला विश्वचषक 2025 मधील अपराजित संघ ऑस्ट्रेलियाला सेमी फायनल च्या सामन्यांमध्ये पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने इंग्लंडच्या संघाला हरवून अंतिम फेरीचे तिकीट मिळवले आहे. भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यांमध्येच विजय मिळवून या स्पर्धेची दमदार सुरुवात केली होती पण त्यानंतर सलग तीन सामन्यांमध्ये भारताच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.
या तीन पराभवानंतर भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यांमध्ये दमदार कमबॅक करत या स्पर्धेची लय पकडली आहे आणि फायनलमध्ये प्रवेश केला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाबद्दल सांगायचे झाले तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला सामना हा इंग्लंड विरुद्ध झाला होता आणि अत्यंत निराशाजनक फलंदाजीमुळे 100 धावांच्या आतच इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेला गुंडाळून पहिला विजय मंजुला होता त्यानंतर पुन्हा एकदा सेमी फायनल मध्ये दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यामध्ये भिडंत झाली आणि यामध्ये दक्षिण आफ्रिकेने बदला घेत फायनल मध्ये प्रवेश केला आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणाऱ्या महिला विश्वचषकाच्या फायनलचा सामना भारतीय चाहते कधी आणि कुठे पाहू शकतात यासंदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
भारतीय महिला संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका महिला संघ यांच्यामध्ये महिला विश्वचषक 2025 चा अंतिम सामना आज खेळवला जाणार आहे हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. या सामन्याचे नाणेफेक हे भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर आणि आणि दक्षिण आफ्रिका कर्णधार लॉरा वोल्वार्ड्ट यांच्या उपस्थितीमध्ये 2.30 मिनिटांनी नाणेफेक होईल. दोन्ही संघांसाठी हे नाणेफेक फार महत्त्वाचे असणार आहे.
𝐅𝐎𝐑 𝐓𝐇𝐄 𝐁𝐈𝐋𝐋𝐈𝐎𝐍 𝐃𝐑𝐄𝐀𝐌𝐒… Just one sleep away from witnessing h̶i̶s̶t̶o̶r̶y̶ 𝙃𝙀𝙍𝙎𝙏𝙊𝙍𝙔 in Navi Mumbai 🏆 Wear your blues with pride, bring your loudest cheers, and #BelieveInBlue! 💙
#CWC25 Final 👉 #INDvSA | Sun, 2nd Nov, 2 PM! pic.twitter.com/NUO9gSbePZ — Star Sports (@StarSportsIndia) November 1, 2025
भारतामध्ये या सामन्याचे थेट प्रक्षेपण हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चैनलवर पाहायला मिळणार आहे. तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग ही जिओ हॉटस्टार वर सकाळी आठ वाजता सुरू होणार आहे. फायनल चा सामना असल्यामुळे संपूर्ण दिवस आज या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग सुरू असेल. भारताच्या संघाने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियन संघाला पराभूत करून आणि ऐतिहासिक रन चेज करून विजय मिळवल्यानंतर संपूर्ण भारतामध्ये त्याचे जल्लोष साजरा करण्यात आला.






