फोटो सौजन्य - IndianPremierLeague
IPL 2025 एका आठवड्यासाठी स्तगीत निर्णय बीसीसीआयने घेतला होता. तथापि, आता स्पर्धा पुन्हा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आयपीएल २०२५ च्या या सीझनचे उर्वरित सामने १७ मे पासून सुरू होत आहेत. तथापि, आयपीएल २०२५ पुन्हा सुरू होताच, ३ स्टार खेळाडू त्यांची फ्रँचायझी सोडणार आहेत. तिन्ही खेळाडू इंग्लंडचे आहेत. जोस बटलर गुजरात टायटन्सकडून सहभागी होऊ शकणार नाही, तर जेकब बेथेल देखील आरसीबी सोडेल. याशिवाय मुंबई इंडियन्सचा फलंदाज विल जॅक्सनेही तणाव वाढवला आहे.
आता या स्पर्धेचे उर्वरित १७ सामान्यांचे वेळापत्रक समोर आले आहे. यामध्ये आता असे सांगण्यात आले आहे की, हे १७ सामने ६ स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. पहिला सामना १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये रंगणार आहे. हा सामना बंगळुरूमध्ये खेळवला जाणार आहे. रविवारी डबल हेडर सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये पहिल्या रविवारी म्हणजेच १८ मे रोजी पहिला सामना जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये रंगणार आहे तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.
Rj Mahvash झाला डेंग्यू! सोशल मीडियावर शेअर केली हेल्थ अपडेट, पोस्ट व्हायरल
२५ मे रोजी रविवारी देखील दोन सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या दिनी पहिला सामना गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यामध्ये सामना खेळवला जाणार आहे हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यानंतर दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये होणार आहे.
तारिख | वेळ | सामना | ठिकाण |
---|---|---|---|
17 मे | 7.30 | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स | बंगळुरू |
18 मे | 3.30 | राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स | जयपूर |
18 मे | 7.30 | दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स | दिल्ली |
19 मे | 7.30 | लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद | लखनऊ |
20 मे | 7.30 | चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स | दिल्ली |
21 मे | 7.30 | मुबंई इंडीयन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स | मुबंई |
22 मे | 7.30 | गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स | अहमदाबाद |
23 मे | 7.30 | रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनराइझर्स हैदराबाद | बंगळुरू |
24 मे | 7.30 | पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स | जयपूर |
25 मे | 3.30 | गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स | अहमदाबाद |
25 मे | 7.30 | सनराइझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स | दिल्ली |
26 मे | 7.30 | पंजाब किंग्स विरुद्ध मुबंई इंडीयन्स | जयपूर |
27 मे | 7.30 | लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू | लखनऊ |
29 मे | 7.30 | क्वालिफायर -1 | TBC |
30 मे | 7.30 | एलिमिनेटर | TBC |
1 जुन | 7.30 | क्वालिफायर – 2 | TBC |
3 जुन | 7.30 | फायनल | TBC |