फोटो सौजन्य - BCCI
टीम इंडियाची बक्षिस रक्कम : देशामध्ये बरेच जण ठाऊक आहेत की टीम इंडिया चार वेळा विश्वविजेता झाला आहे. भारताचा संघ चौथ्यांदा २९ जून रोजी विश्वविजेता झाला आणि जगभरामध्ये उत्सव साजरा करण्यात आला होता. यावेळी आयसीसीने २०.४२ कोटी रुपये भारतीय संघाला जिंकल्यानंतर दिली. त्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी केली होती. बीसीसीआयने ही सर्वाधिक रक्कम दिली आहे. भारताच्या संघाने वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला विश्वविजेते केले आहे.
भारताने पहिल्यांदा १९८३ ला पहिल्या विश्वचषक जिंकला. त्यानंतर भारताने पहिला T-२० विश्वचषक २००७ मध्ये जिंकला आहे. तर दुसरा एकदिवसीय विश्वचषक २०११ मध्ये भारताने जिंकला. त्यानंतर १३ वर्षानंतर भारताने चौथा विश्वचषक जिंकला आहे. विश्वचषकांमध्ये भारताच्या संघ कधी जिंकला आहे आणि त्यांना किती बक्षीस मिळाले हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
बीसीसीआय ही आता जगामधील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. परंतु भारताच्या संघाने १९८३ मध्ये जेव्हा वर्ल्डकप जिंकला होता मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी तीन बळी घेत बलाढ्य वेस्ट इंडिजला १४० धावांत आटोपण्यास मदत केली. १९८३ विश्वचषक विजेत्या खेळाडूंना बीसीसीआयने प्रत्येकी २५,००० रुपयांचे रोख बक्षीस दिले होते. त्यावेळी हा तो काळ होता जेव्हा बीसीसीआयची अवस्था फार वाईट होती. विजेत्या संघातील खेळाडूंना बक्षिसे देण्यासाठी मंडळाकडे पैसे नव्हते. प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांनी कपिल देव यांच्या टीमला बक्षिसाची रक्कम देण्यासाठी शो करून पैसे उभे केले होते. लता मंगेशकर यांच्या शोमधून जमा झालेल्या पैशातून विजेत्या संघातील खेळाडूंना प्रत्येकी एक लाख रुपये बक्षीस म्हणून देण्यात आले.
भारताच्या संघाने पहिला T२० विश्वचषक २००७ मध्ये जिंकला आहे. यामध्ये भारताचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनी यांच्याकडे सोपवण्यात आले होते. T२० विश्वचषक स्पर्धेची ही पहिलीच आवृत्ती होती, ज्यामध्ये निळ्या आर्मीने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटकावले होते. या विजयावर बीसीसीआयने टीम इंडियाला १२ कोटी रुपयांचे बक्षीस दिले होते. संघाव्यतिरिक्त ६ षटकार मारणाऱ्या युवराज सिंगला १ कोटी रुपयांची वेगळी बक्षीस रक्कम देण्यात आली होती. यामध्ये ७.५ कोटी रुपये आयसीसीने तर बीसीसीआयने २ कोटी रुपये दिले होते.
भारताच्या संघाने महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली २०११ मध्ये दुसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. यावेळी धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्या विश्वचषक उचलला. या विजयानंतर भारतीय बोर्ड अर्थात बीसीसीआयने टीम इंडियाला 39 कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली होती. या बक्षीस रकमेत संघातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी २ कोटी रुपये मिळाले. उर्वरित पैसे कोचिंग स्टाफ आणि सिलेक्टर्समध्ये वाटण्यात आले.
टीम इंडियाने २०२४ मध्ये T२० वर्ल्ड कपचे दुसरे जेतेपद पटकावले. या विजयानंतर बीसीसीआयने टीम इंडियाला १२५ कोटी रुपयांची बक्षीस रक्कम दिली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला हा विजय मिळाला. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या सरकारने शिवम दुबे, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि यशस्वी जैस्वाल यांना ११ कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.