भारती फुलमाळीच्या संघर्षाची कहाणी (फोटो- ians)
अमरावती शहरातून सुरू झालेला भारतीचा प्रवास हा खूप थक्क करणारा आहे. आर्थिक परिस्थितीवर केलेली मात आणि सोशल मिडियावर झालेल्या ट्रोलिंगचा सामना करत भारतीय संघात केलेले तिने पुनरागमन अत्यंत संघर्षमय असा आहे. त्याबाबत जाणून घेऊयात. सध्या आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कप २०२६ ही स्पर्धा सुरू आहे. सध्या भारतीय संघ चांगली कामगिरी करत आहे. मात्र या संघातील भारती फुलमाळी खेळाडूचा संघर्ष क्रीडा विश्वात चर्चेचा ठरला आहे. मैदानाबाहेर लोकांच्या ट्रोलिंगचे आणि टिकचे घाव सोसून तिने मोठ्या दिमाखात भारतीय संघात प्रवेश केला आहे.
अमरावती येथील सामान्य कुटुंबात भारती फुलमाळीचा जन्म झाला. तिचे वडील शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. वयाच्या १३ व्या वर्षापासून भारतीने फलंदाजीचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. आर्थिक स्थिती बेताची असल्याने तिच्याकडे क्रिकेट खेळण्याचे साहित्य खरेदी करणे शक्य नव्हते. मात्र स्वप्न आणि मनात जिद्द असल्याने तिने विदर्भ महिला संघात आपले स्थान पक्के केले.
भारती फुलमाळीने २०१९ मध्ये आपल्या जिद्दीच्या, चिकाटीच्या जोरावर भारतीय संघात डेब्यू केले होते. मात्र खराब फॉर्ममुळे तिला संघातून बाहेर पडावे आगळे होते. जवळपास ७ वर्षे ती भारतीय संघातून बाहेर होती. मात्र तिने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळणे सुरूच ठेवले. त्या ठिकाणी तिने कठोर मेहनत घेतली.
महिला प्रीमियर लीगमधून खेळताना भारती फुलमाळीने फिनिशरची भूमिका निभावली. ती गुजरातच्या संघाकडून खेळत होती. तिने केलेल्या शानदार खेळीमुळे आणि जबरदस्त फॉर्ममुळे बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना भारती फुलमाळीची दखल घ्यावी लागली. तब्बल ७ वर्षांनी भारती फुलमाळीची थेट आयसीसी महिला टी २० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. एक आक्रमक फलंदाज म्हणून भारती फुलमाळी ओळखली जाते.
ट्रोलिंगचा केला सामना
भारती फुलमाळीला सोशल मिडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागणार आहे. विकृत वर्गाकडून तिचे वाईट पद्धतीने सोशल मिडियावर टीका केली जात होती. ट्रोलिंग केले जात होते. तिची देहबोली आणि तिच्या दिसण्यावरून तिला प्रचंड प्रमाणात ट्रोल करण्यात आले होते. तिच्या दिसण्यावरून तिला टपुरुष’ म्हणून देखील ट्रोल केले गेले. मात्र या टीकेला, या विकृतीला भारती फुलमाळीने आपल्या फॉर्मने उत्तर दिले आहे. तिने आपल्या फलंदाजीने या सर्वांची तोंडे बंद केली आहेत. महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्याची कन्या असणाऱ्या भारती फुलमाळीचा संघर्ष आणि जिद्दीच्या जोरावर तिने गाठलेले शिखर आज अनेकांसाठी आदर्श बनत आहे. भारती फुलमाळी आज जगभरातील कोट्यवधी तरुण मुलींसाठी आदर्श बनली आहे.






