फोटो सौजन्य - BCCI Women सोशल मिडीया
महिला टी२० विश्वचषक अंतिम सामना : २०२४ मध्ये भारताच्या पुरुष संघाने T२० विश्वचषक जिंकला होता. आता पुरुष टी२० संघाचे आयोजन श्रीलंका आणि भारतामध्ये केले जाणार आहे २०२६ मध्ये पुरुष टी२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. त्याआधी आता आयपीएल नंतर क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जून महिन्यामध्ये महिला टी२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले आहे. या बाबतीत आता मोठी अपडेट आयसीसीने शेअर केली आहे. महिला टी२० विश्वचषकाचा अंतिम सामना पुढील वर्षी ५ जुलै रोजी लंडनमधील लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळवला जाणार आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी ही माहिती दिली. या स्पर्धेत १२ संघ सहभागी होतील आणि एकूण ३३ सामने खेळवले जातील. ही स्पर्धा १२ जूनपासून सुरू होईल. लॉर्ड्स व्यतिरिक्त, उर्वरित सामने ओल्ड ट्रॅफर्ड, हेडिंग्ले, एजबॅस्टन, ओव्हल, हॅम्पशायर बाउल आणि ब्रिस्टल काउंटी ग्राउंडवर खेळले जातील. सर्व संघांना दोन गटात विभागले जाईल आणि त्यानंतर बाद फेरीचे सामने खेळवले जाणार आहेत.
ICC T20 World Cup 2026
12 teams (England, India, Australia, New Zealand, Pakistan, South Africa, Sri Lanka, West Indies, Four Qualifiers) will play in 7 venues.
Final will be played at Lord’s!#T20WorldCup #T20WorldCup2026 pic.twitter.com/JYtvQI1QLf
— Women’s CricInsight (@WCI_Official) May 1, 2025
जूनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या विश्वचषकासाठी आतापर्यंत संघ पात्र ठरले आहेत. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसह आठ संघ पात्र ठरले आहेत. उर्वरित चार संघांची निवड आयसीसी महिला टी२० विश्वचषक पात्रता २०२५ मधून केली जाईल.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले, “सर्व संघांना युकेमध्ये प्रचंड पाठिंबा मिळतो. २०१७ मध्ये लॉर्ड्स येथे झालेल्या महिला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात प्रेक्षकांनी गर्दी केली होती आणि अंतिम सामन्यासाठी यापेक्षा चांगले ठिकाण असू शकत नाही.”
शतकासह उघडला ‘पंजा’! शकिबच्या ऐतिहासिक विक्रमाची केली बरोबरी, मेहदी हसन बनला हिरो
ते पुढे म्हणाले, “आम्ही स्पर्धेच्या तयारीवर लक्ष केंद्रित करत आहोत. आम्हाला विश्वास आहे की रोमांचक टी-२० क्रिकेट केवळ येथील चाहत्यांना आकर्षित करणार नाही तर लॉस एंजेलिस ऑलिंपिक २०२८ मध्ये क्रिकेटच्या पुनरागमनासाठी एक मोठी संधी बनेल.” मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील २०२० च्या टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्याला विक्रमी ८६,१७४ प्रेक्षक उपस्थित राहिले. त्यानंतर, केपटाऊन (२०२३) आणि दुबई (२०२४) येथे झालेल्या टी२० विश्वचषक फायनलमध्येही स्टेडियम पूर्ण भरले होते.