एकाच रिचार्जमध्ये 10 OTT सबस्क्रिप्शन एकदम मोफत (Photo Credit- X)
Jio Recharge Plan OTT: वेगवेगळ्या OTT (ओव्हर-द-टॉप) सेवांवरील कंटेंट ॲक्सेस करण्यासाठी आता तुम्हाला त्यांचे स्वतंत्रपणे सबस्क्राइब करण्याची गरज नाही. कारण टेलिकॉम क्षेत्रातील प्रमुख कंपनी रिलायन्स जिओने (Reliance Jio) आकर्षक प्रीपेड प्लॅन पोर्टफोलिओमध्ये असे काही रिचार्ज आणले आहेत, जे फक्त एक-दोन नव्हे, तर तब्बल 10 OTT प्लॅटफॉर्मवर मोफत ॲक्सेस देतात.
एकाधिक OTT सेवा देणारा जिओचा सर्वात स्वस्त प्लॅन हा ₹175 किमतीचा आहे. मात्र, हा केवळ डेटा-पॅक (Data-Only Pack) आहे.
Diwali Offer: दिवाळीनिमित्त Google One ने आणला जबरदस्त ऑफर! फोटो आणि डेटा साठवणं होणार आणखी सोपं
जर तुम्हाला दररोज डेटा आणि अमर्यादित 5G डेटा हवा असेल, तर ₹445 चा प्लॅन एक उत्तम पर्याय आहे.
सारखा रिचार्ज करून कंटाळलाय? एकदाच करून टाका Jio अन् Airtel चे वार्षिक प्लॅन्स; मिळतील ‘हे’ फायदे