सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्याचे अंतिम आवाहन; तुम्हालाही मिळणार १ कोटी रुपये जिंकण्याची संधी, हा आहे उपक्रमचा उद्देश
अलीकडेच राष्ट्रीय इनोव्हेशन स्पर्धा सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा 29 आणि 30 जून अशा दोन दिवसांसाठी आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे ही स्पर्धा १४ ते २२ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकाला तब्बल 1 करोड रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. हा उपक्रम नक्की काय आहे, त्याचा उद्देश काय आहे, उपक्रम आयोजित करण्याची कारण काय आहे, जाणून घेऊया.
जून महिन्यात लाँच झाले हे ढासू Smartphones! Infinix Hot 60i पासून Oppo K13x 5G पर्यंत… वाचा सविस्तर
राष्ट्रीय इनोव्हेशन स्पर्धा सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोसाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. यामध्ये नवी दिल्लीपासून ते थेट कोल्हापूरपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचा समावेश आहे. वास्तविक विश्वातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. समस्यांचे निराकरण करण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम संकल्पनांचा वापर करावा लागणार आहे. ही स्पर्धा म्हणजेच तुमची 1 करोड रुपये जिंकण्याची संधी आहे. कंपनीने म्हटलं आहे की, तुमची संकल्पना भावी मोठे सोल्यूशन ठरू शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)
नवी दिल्ली, कोल्हापू आणि इतर अनेक शहरांतील विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. विविध शहरे व क्लासरूम्समधील हजारो विद्यार्थ्यांनी ‘मी भविष्यासाठी समस्यांचे निराकरण करू शकतो’ या साहसी विश्वासासह या स्पर्धेत पुढाकार घेतला आहे. सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारो रोडशोज अंतिम टप्प्यात आहे. अशातच आता भारतातील तरूण चेंजमेकर्सकरिता त्यांच्या संकल्पनांना कृतीत आणण्याच्या संधीचा फायदा घेण्याचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे.
१४ ते २२ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय इनोव्हेशन स्पर्धा सॅमसंग सॉल्व्ह फॉर टूमारोसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२५ आहे. या स्पर्धेमुळे देशभरात आधीच उत्सुकता निर्माण झाली आहे. हा उपक्रम २९ एप्रिल २०२५ रोजी सुरू करण्यात आला होता. हा उपक्रम भारतभरातील वि़द्यार्थ्यांना डिझाइन थिंकिंग टूल्स, सॅमसंग व आयआयटी दिल्ली तज्ञांकडून मार्गदर्शन, गुंतवणूकदारांसोबत संपर्क, प्रोटाटाइपिंग सपोर्ट आणि १ कोटी रूपये जिंकण्याची संधी देतो.
गेल्या काही आठवड्यांपासून ओपन हाऊसेस आणि रोडशोने असाधारण दूरदृष्टी असलेल्या विद्यार्थ्यांना एकत्र आणले आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये विद्यार्थ्यांनी प्रदूषणासाठी मानसिक आरोग्य अॅप्स आणि एआय-संचालित सोल्यूशन्सचे स्वप्न पाहिले. गुजरात आणि महाराष्ट्रामध्ये शाश्वत पॅकेजिंग, वारसाला उजाळा आणि सर्वसमावेशक शिक्षणासंदर्भातील संकल्पनांना व्यासपीठ मिळाले. प्रत्येक शहरात एक संदेश स्पष्टपणे पसरला – भारतातील तरूण वास्तविक विश्वातील समस्यांसाठी वास्तविक सोल्यूशन्स तयार करण्यास सज्ज आहेत.
गाझियाबादमधील विद्यार्थीनी इशिताने या स्पर्धेबाबत सांगितलं की, “पहिल्यांदाच मला कोणीतरी विचारले की, मला कोणत्या समस्येचे निराकरण करायचे आहे. या प्रश्नाने सर्वकाही बदलले.” तसेच पुण्यामधील विद्यार्थी आकाश म्हणाला, “मी ‘योग्य वेळेची’ वाट बघत न राहता प्रत्यक्ष सोल्यूशन निर्माण करायला सुरूवात केली. सॉल्व्ह फॉर टूमारोने मला विश्वास दिला की, माझी संकल्पना महत्त्वाची आहे.”